Vidarbha Farmers : अवैध सावकारीवर धाड; कागदपत्रे जप्त, कारवाईने हादरले

Administration action against illegal moneylending : आतापर्यंत २१९ प्रकरणांत कारवाई, ६२ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे

Akola 20 ऑगस्ट 2025 रोजी अकोला शहरात अवैध सावकारी करणाऱ्यावर धाड घालण्यात आली. प्राप्त तक्रारीनुसार डॉ. प्रवीण एच. लोखंडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

गैरअर्जदार गोरखनाथ नथ्थूजी वानखडे, रा. पंचशील नगर, अकोला यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2024 चे कलम 16 अन्वये कार्यवाही झाली. पथक प्रमुख दिपक सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली धाडीत इसारपावत्या, करारनामे, पावत्या, धनादेश, डायरी, चिठ्ठ्या यांसह विविध कागदपत्रे जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस बंदोबस्तात पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली.

Constitution Amendment : 30 दिवस तुरुंगात… आणि पद गेले !

जिल्हा उपनिबंधक डॉ. लोखंडे यांनी नागरिकांना आवाहन केले की, अवैध सावकारी करणाऱ्याची तक्रार पुराव्यासह उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधक कार्यालयात दाखल करा. कर्ज घेण्यासाठी नोंदणीकृत पतसंस्था, बँका किंवा परवानाधारक सावकार यांच्याकडूनच कर्ज घ्या.

कारवाईचा आढावा

आतापर्यंत 219 प्रकरणांत कार्यवाही

त्यापैकी 62 प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे नोंद

122 प्रकरणांत चौकशी सुरू

151.64 एकर शेतीजमीन, 4776 चौ. फुट जागा, एक राहता फ्लॅट व 163.50 चौ. मी. जागा मूळ मालकांना परत

Lump sum FRP : एकरकमी एफआरपीसाठी शेतकऱ्यांची कोर्टात धडक !

 

अकोला जिल्ह्यातील अनुज्ञप्तीधारक सावकारांची संख्या

तालुका संख्या

अकोला 113
बार्शीटाकळी 12
पातूर 7
बाळापूर 28
तेल्हारा 5
अकोट 16
मूर्तिजापूर 18
एकूण 199