Another noose of illegal moneylenders around farmers : सरकारची अनास्था; बँकाही कर्ज देत नाहीत
Amravati वारंवार होणारे हवामान बदल, कधी कमी तर कधी अतिवृष्टी, यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांचे अर्थचक्र कोलमडले आहे. बँकांकडून कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना सावकारांचा आश्रय घ्यावा लागत आहे. परवानाधारक १०६३ सावकारांनी १,३१,२६५ शेतकऱ्यांना १७६.७७ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे. अवैध सावकारांकडूनही मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप होत असल्याचे उघड झाले आहे. मनमानी व्याजदरांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर कर्जफेड करणे कठीण जाते, परिणामी त्यांची बँकांकडे थकबाकीदार म्हणून नोंद होते. त्यामुळे खरीप हंगामासाठी आवश्यक भांडवल उभारण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारांकडे जावे लागते. एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत पश्चिम विदर्भातील १.३१ लाख शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले.
Co-operative Sector : सहकार दिंडीच्या आगमनाची बुलडाण्यात जय्यत तयारी
मात्र, सहकार कायद्यानुसार शेतीसाठी सावकारी कर्ज देण्यास बंदी असल्याने ही कर्जे बिगरशेती कारणांसाठी घेतल्याचे दाखवले जात आहे. सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी सावकारांकडे जाणे अपरिहार्य झाले आहे. परंतु, सावकारांची वाढती संख्या, अवैध सावकारी, आणि मनमानी व्याजदर यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट अधिक गंभीर होत आहे.
सावकारी कर्ज व्यवस्थेवर अधिक नियंत्रण आणावे. बँकांकडून शेतकऱ्यांना सहज कर्ज मिळण्यासाठी उपाययोजना करावी. अवैध सावकारी रोखण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या अहवालानुसार, नऊ महिन्यांत पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सावकारी कर्जवाटप झाले आहे.
Uddhav Balasaheb Thackeray Shivsena : शिवसेनेचे वाशिम बसस्थानकात आंदोलन
एप्रिल ते डिसेंबर २०२४ या कालावधीत अमरावतीमधील ६९,२५१ शेतकऱ्यांना ९८.९१ कोटी रुपये, यवतमाळमधील ३,४५२ शेतकऱ्यांना ४.४१ कोटी रुपये, अकोला येथील ३८,४७४ शेतकऱ्यांना ४७.९० कोटी रुपये, वाशिम येथील ३,८६० शेतकऱ्यांना १०.४८ कोटी रुपये, बुलढाणा येथील १६,००३ शेतकऱ्यांना १४.७१ कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे. एकूण १,३१,२६५ शेतकऱ्यांना १७६.७७ कोटी रुपये कर्जवाटप झाले आहे