Bachchu Kadu loan waiver for farmers : छत्रपती संभाजी महाराजांनी रक्ताचा एक – एक थेंब सांडवून स्वराज्याचं रक्षण केलं, आम्ही रक्ततान करून करतोय
Nagpur : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे त्यांच्या अभिनव आंदोलनांसाठी ओळखले जातात. महायुतीने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. आता लाडक्या बहीणींप्रमाणे शेतकऱ्यांनाही महायुती सरकार फसवत आहे, असे म्हणत बच्चू कडू यांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
बच्चू कडू यांनी यावेळी आक्रमक आंदोलन न करता संयमाचा मार्ग अवलंबला आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि दिव्यांग महिलांना ६ हजार रुपये मानधन द्या, यासाठी बच्चू कडू यांच्या पक्षातर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठेतील निवासस्थान असलेल्या त्रिकोणी पार्क परिसरात हे आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान आंदोलन करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बच्चू कडू म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांची आज (१४ मे) जयंती आहे. रक्ताचा एक – एक थेंब सांडवून त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले आणि आज आम्ही रक्त न सांडवता शेतकरी आणि दिव्यांगांच्या रक्षणासाठी रक्तदान केलं. अन्नदाता आणि दिव्यांगांसाठी केलेल्या रक्तदानातून सात बारा कोरा करा, असा संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. रक्त सांडवण्यापेक्षा ते दान केलेलं बरं, असं मला वाटतं.
Income Tax Department : अमरावती, यवतमाळ, अकोल्यातील सोन्याचांदीच्या दुकानांवर धाडसत्र !
खरे रामभक्त असतील तर..
सकारात्मक आणि तितक्याच संयमाने केलेल्या या आंदोलनची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. प्रभू श्रीरांमांचा जयघोष ते सदा न कदा करत असतात. ते जर खरे रामभक्त असतील तर उद्या होणारं रक्त सांडवण्याचं आंदोलन त्यांनी थांबवावं आणि आजच आपली भूमिका स्पष्ट करावी. गेल्या तीन – चार महिन्यांपासून ते कर्जमाफीवर बोलतच नाहीयेत. म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.