Vidarbha farmers : शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत व सरसकट कर्जमाफी द्या

Cobgress protest in front of collector office: काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Akola : सततच्या पावसामुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीबाबत शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत व सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, या प्रमुख मागण्यांसह काँग्रेस पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला शेंगा न लागणे, तर सप्टेंबर महिन्यातील पावसामुळे अन्य पिकांनाही मोठा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे. खरीप हंगामात उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचे गणितच बिघडले असून, रब्बी हंगामासाठी निधी कोठून आणावा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.

Local Body Elections : सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपची धडपड, बैठकांचे सत्र!

दरम्यान, अकोला तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याने तालुका काँग्रेसतर्फे भरीव मदतीची मागणी करत आंदोलन छेडण्यात आले.

२०१४ ते आतापर्यंत महायुती व महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकूण तीन कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र, त्या योजनांतील अटी, निकष व दस्तऐवजांच्या प्रक्रियेमुळे तब्बल ८१ हजार ३३५ शेतकरी लाभापासून वंचित राहिले आहेत. या योजनांतर्गत एकूण १२९४ कोटी रुपये लाभार्थ्यांच्या खात्यांवर जमा झाले. तथापि, महाविकास आघाडी सरकारच्या कर्जमुक्ती योजनेत युती सरकारपेक्षा सुमारे ८१ कोटी रुपयांची अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाल्याचेही नमूद करण्यात आले.

पूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये अटी-शर्तींचा भडिमार असल्याने अनेक शेतकरी वंचित राहिले. त्यामुळे आता जाहीर होणारी कर्जमाफी विना अट आणि निकषांशिवाय करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाने नुकतेच मदतपॅकेज जाहीर केले आहे. पॅकेजनुसार कोरडवाहू पिकांसाठी प्रति हेक्टर ८,५०० रुपये, बागायत पिकांसाठी १७,००० रुपये, तर बहुवार्षिक पिकांसाठी २२,५०० रुपये इतकी मदत निश्चित करण्यात आली. मात्र काँग्रेसने या दरात वाढ करून प्रति हेक्टर ५०,००० रुपयांची मदत देण्याची मागणी केली आहे.

Vidarbha Farmers : ३३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान, अहवाल पाठवून एक महिना झाला!

सरकारने हमीभावानुसार शेतमाल खरेदी केंद्रे त्वरित सुरू करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा; अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून अधिक तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा तालुकाध्यक्ष मो. खालिद मो. ज़ाकिर यांच्यासह अन्य नेत्यांनी दिला.