Compensation of Rs 80 crores approved for 56 thousand farmers : अखेर ८० कोटींची भरपाई मंजूर; ५६ हजार शेतकऱ्यांना दिलासा
Akola परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शासनाने ७९ कोटी ४४ लाख रुपयांची भरपाई मंजूर केली आहे. त्यामुळे ५६,७०० बाधित शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्यातील ५७,३७१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठे नुकसान झाले होते.
खरीप हंगामात कधी अवर्षण, तर कधी अतिवृष्टीमुळे पिके उध्वस्त झाली. जूनच्या सुरुवातीला पाऊस झाल्यानंतर काही आठवडे उघडीप राहिली. मात्र, जुलैपासून सतत पावसाचा जोर वाढला. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले. १० पेक्षा जास्त मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती.
Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या मुलांचे उपोषण; चिखलीत अनोखे आंदोलन
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद, कृषी व महसूल विभागाने संयुक्त पंचनामे करून अहवाल सादर केला. त्यानंतर राज्य सरकारकडून मदतीसाठी प्रस्ताव मंजूर झाला. पूर्वी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई जमा केली जात होती. मात्र, गेल्या वर्षीपासून ऑनलाइन प्रणाली लागू करण्यात आली आहे. आता मदतीसाठी पात्र शेतकऱ्यांची माहिती शासनाला सादर केली जाणार आहे. सरकारकडून थेट त्यांच्या खात्यात मदतीचा निधी जमा होईल.
जिल्ह्यात सातत्याने झालेल्या पावसामुळे खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारीमुळे दुष्काळ घोषित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने सवलती आणि आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
Vidarbha Farmers : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ८० कोटींचा मदत निधी मंजूर!
जिल्ह्यातील १,८९,३४६ हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. मात्र, पंचनाम्यांसाठी अद्याप मान्यता मिळालेली नाही. जिल्हा प्रशासनाने विशेष बाब म्हणून मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर निर्णय होणे बाकी आहे. ८० कोटींच्या मंजूर मदतीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असला, तरी प्रत्यक्ष निधी किती लवकर खात्यात जमा होतो. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.