Breaking

Vidarbha Farmers : बोगस सोयाबीन बियाणांमुळे दुबार पेरणीची वेळ

Demand to file criminal cases against bogus seed companies : फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी, कृषी अधिकाऱ्यांनी वेळेत पंचनामेच केले नाहीत

Buldhana मोताळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यामुळे दुबार पेरणीचा सामना करावा लागत असून, यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी आज कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कडक शब्दांत जाब विचारला.

शिंदे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या बोगस बियाणे कंपन्यांवर आणि नफेखोरीसाठी बोगस बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे. यासोबतच दोषींना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे.”

Local Body Elections : सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांची राजकीय गणिते फसली

शेतकऱ्यांनी बियाणे न उगवल्याबाबत तक्रारी केल्या असूनही कृषी अधिकाऱ्यांनी वेळेत पंचनामे केले नसल्याची तक्रार शिंदे यांनी अधिकाऱ्यांच्या समोर मांडली. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजप शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून दोषींवर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. जिल्ह्यातील इतर भागातही बोगस बियाण्याच्या तक्रारी वाढत असल्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक आहे.

MLC Abhijit Wanjari : अपंग विभागच रिक्त पदांच्या बाबतीत ‘अपंग’!

या चर्चासत्रात कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी देवेंद्र ढगे, भाजपा मोताळा तालुकाध्यक्ष सचिन शेळके, माजी तालुकाध्यक्ष गजानन घोंगडे, मोताळा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सलीम चुनावाले, तसेच रिधोरा जहांगिर येथील तक्रारदार शेतकरी राजाराम सुरगडे व प्रकाश झंवर उपस्थित होते.