Vidarbha Farmers : पाडव्याला उभारली मागण्यांची ‘गुढी’!

Farmer erected a Gudhi of various demands : शेतकऱ्याचा अनोखा उपक्रम; सरकारवर आरोप

Amravati गुढीपाडवा हा हिंदू नववर्षातील पहिला महत्त्वपूर्ण सण असल्याने लोक विकास संघटनेचे नेते गोपाल भालेराव यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आगळा-वेगळा उपक्रम राबवला. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार कर्जमाफीचे आश्वासन केव्हा पूर्ण करणार? तसेच सोयाबीन, कापूस, हरभरा आणि तुरीला योग्य हमीभाव केव्हा मिळणार? या मुद्द्यांकडे शासनाचे आणि जनतेचे लक्ष वेधण्यासाठी भालेराव यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी शेतकऱ्यांच्या मागण्यांची गुढी उभारली.

निवडणुकीदरम्यान सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि शेती पिकांच्या दरात भरघोस वाढ देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप भालेराव यांनी केला आहे.

Bacchu Kadu : निधी द्या, नाहीतर आत्मदहनाची परवानगी द्या!

भालेराव म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी ‘बटेंगे तो कटेगे’ आणि ‘हिंदू खतरे में है’ अशा घोषणांद्वारे हिंदू शेतकऱ्यांना भावनिक भ्रमित करण्यात आले. मात्र, आता हेच हिंदू सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे. या अन्यायाविरोधात मी गुढीपाडव्याच्या दिवशीच आगळे-वेगळे आंदोलन सुरू केले आहे.” तसेच त्यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

District Marketing Federation : गोरेगाव खरेदी विक्री संघात बोगस शेतकऱ्यांची नोंद

आंदोलनातून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा
या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या पुढे नेल्या जातील, असे भालेराव यांनी स्पष्ट केले आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.