Vidarbha Farmers : कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको !

Farmers’ agitation for purchase of cotton : कृषी उत्पन्न बाजार समितीपुढे तणावाचे वातावरण

Buldhana बुलडाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. शेतकऱ्यांनी शासनाच्या हमीभाव केंद्रावर कापूस खरेदीची मागणी केली. त्यामुळे बाजार समिती समोरील देऊळगाव राजा-जालना मार्गावर रस्ता अडवला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांना घटनास्थळी हजर राहावे लागले.

शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता, बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, उपसभापती दादाराव खार्डे, आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. यासोबतच त्यांनी शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि परिस्थितीचे गांभीर्य त्यांनी सांगितले. शनिवार आणि रविवार रोजी केंद्र कापूस खरेदी करत नाहीत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Chandrashekhar Bawankule : पाच वर्षात नागपूरला आंतरराष्ट्रीय शहर बनवणार !

तसेच कापूस खरेदीची प्रक्रिया ऑनलाइन आहे. दिवसभर कापूस खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन पावती दिली जाते. पण संध्याकाळी ६ वाजता ऑनलाईन प्रक्रिया बंद होते. त्यामुळे कापूस खरेदी थांबली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला होता.

शिवसेना नेते दीपक बोरकर यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने समर्थन दिले. या समस्येवर लक्ष देण्याची मागणी केली. बाजार समितीच्या वतीने सभापती समाधान शिंगणे आणि उपसभापती दादाराव खार्डे यांनी उपसंचालक सीसीआय यांच्याशी फोनवर चर्चा केली. तब्बल दोन तासांच्या चर्चेनंतर उपसंचालकांनी शनिवारी कापूस खरेदी सुरू ठेवण्याची हमी दिली. यामुळे शेतकऱ्यांचे आंदोलन थांबले आणि सर्व शेतकऱ्यांना शनिवारी कापूस खरेदी होईल, अशी सूचना देण्यात आली.

आंदोलन थांबल्यानंतर, बाजार समितीमध्ये जवळपास ३०० ट्रॅक्टर कापूस घेऊन उभे होते. या घटनेच्या वेळी बाजार समिती सभागृहात सभापती समाधान शिंगणे, उपसभापती दादाराव खार्डे, दीपक बोरकर, पोलिस निरीक्षक संतोष महल्ले, संचालक बद्री शिंदे, कोल्हे, राहुल महाजन, अभय दिडहाते, सचिव किशोर मस्के, पत्रकार, पोलिस, आणि शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

Minister Dr. Panaj Bhoyar : कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवा !

या प्रकरणात वरिष्ठ अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या मागणीवर योग्य वेळी निर्णय घेतल्याने आंदोलन शांततामयरीत्या संपले, आणि शेतकऱ्यांना आश्वासन दिले की शनिवारी कापूस खरेदीची प्रक्रिया सुरू राहील.