Vidarbha Farmers : तहसील कार्यालयाच्या छतावर स्वाभिमानींचे आंदोलन!

Farmers protest on the roof of the tehsil office : दुष्काळी अनुदान रखडल्याने संतप्त निदर्शने

Malkapur राज्य शासनाने जाहीर केलेले दुष्काळी अनुदान रखडल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मलकापूर तहसील कार्यालयाच्या छतावर थेट चढून अनोखे आंदोलन छेडले. जिल्हाध्यक्ष नीलेश नारखेडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात मोठी खळबळ उडाली.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदत पॅकेजअंतर्गत राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अनुदान वितरित झाले आहे. मात्र मलकापूर–नांदुरा तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नाही, अशी संघटनेची तीव्र नाराजी आहे. याच निषेधार्थ जिल्हाध्यक्ष नारखेडे यांनी थेट छतावर चढून शासनाचे लक्ष वेधले. “शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ अनुदान जमा करा,” अशी त्यांची मागणी होती.

Local Body Elections : विचित्र आघाड्या आणि २०० अपक्ष उमेदवार!

तहसीलदार महेश रामगुंडे यांनी तातडीने नारखेडे यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. छतावरून खाली उतरवून चर्चेसाठी बोलावले. दुपारी झालेल्या चर्चेत रखडलेल्या अनुदानाबाबत सकारात्मक आश्‍वासने मिळाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनास तात्पुरती स्थगिती जाहीर केली.