Vidarbha Farmers : कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा रात्रभर जागर!

Farmers vigil all night for debt relief : शेतमाल हमीभाव कायदा लागू करण्याची मागणी

Akola शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने द्यावी, या प्रमुख मागण्यांसह शेतकरी जागर मंचच्या वतीने बुधवारी रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर ‘जागर आंदोलन’ करण्यात आले.

शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती तातडीने द्यावी. सोयाबीनला प्रति क्विंटल ₹६,०००, हरभऱ्याला ₹८,०००, कापसाला ₹१०,००० आणि तुरीला ₹१२,००० हमीभाव मिळावा. हमीभाव ठरवताना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी. शेतीसाठी आवश्यक अवजारे, खते व अन्य साहित्य जीएसटीमुक्त करावे, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे.

Electric towers in Farm Field : आधी मोबदला द्या, नंतरच दुरुस्तीच्या कामाला हात लावा!

पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी १२ महिने करावा. शेतकऱ्यांना प्रति हंगाम प्रति एकर किमान ४०,००० रुपयां प्रमाणे पीक कर्ज मिळावे. या मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचच्या वतीने ‘जागर आंदोलन’ करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, अक्षय राऊत, रवी पाटील अरबट, गोपाल दातकर, कपिल ढोके, विजय देशमुख, पुंडलिक अरबट, टीना देशमुख, प्रमोद पागृत, मोहंमद रेहान यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले होते.

बुधवारी रात्री १०:०० वाजता सुरू झालेल्या ‘जागर आंदोलन’चा समारोप गुरुवारी पहाटे ०४:०० वाजता झाला. रात्रभर शेतकऱ्यांनी जागर करत त्यांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

शेतकऱ्यांना होतोय तोटा
सरकार सातत्याने शेतकरीविरोधी धोरणे राबवून हमीभाव नाकारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. सध्या शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सोयाबीनला केवळ ३७०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अशात शेतकरी हताश झाले आहेत. सरकार मात्र शांतपणे दुर्लक्ष करत आहे. या निष्क्रिय सरकारला जागे करण्यासाठी शेतकरी जागर मंचाने आंदोलन छेडले आहे.

Social Responsibility : मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या संस्थेसाठी पुढे आले महिला मंडळ

चर्चा करायला तयार नाही
दिल्लीच्या सीमेवरील शेतकरी आंदोलन मागे घेताना सरकारने हमीभाव कायदा लवकरच लागू करू, असे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. पंजाबमधील खानौरी सीमेजवळ गेल्या वर्षभरापासून शेतकरी नेता जगजितसिंग उग्गेवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारच्या वतीने त्यांच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असा आरोज जागर मंचाने केला आहे.