Farmers walk daily through 4 ft deep water to reach their fields : नाल्यातील पाणी बाहेर आले, प्रशासनाच्या गलथान कारभारावर संताप
Chikhali यावर्षी निसर्गाने शेतकऱ्यांना चांगलेच वेठीस धरले आहे. सततधार पावसामुळे आधीच पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला अतिरिक्त धोका निर्माण झाला आहे. गावालगतच्या नाल्यातून तब्बल ४ फूट खोल पाणी वाहत असल्याने शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून त्यातूनच शेतात जावे लागत आहे.
गावाच्या उत्तरेस खडकी शिवारातील गट क्रमांक १०२३ ते १०२८ मधील विनायक पडघान, शिवाजी पडघान, रामेश्वर पडघान, लक्ष्मण पडघान यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची शेते आहेत. पावसाळ्यात नेहमीच या रस्त्यावर नाल्याचे पाणी वाहते, मात्र यावर्षी सततधार पावसामुळे हा प्रवाह प्रचंड वाढला असून, शेतकऱ्यांना अंगावरील कपडे काढून जीव धोक्यात घालून शेतात जावे लागत आहे. रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून, शेतात पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
Adivasi Pardhi Community : आदिवासी पारधी महिलेने केला सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप !
स्थानिक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, “आजवर या शेतरस्त्याचे खडीकरण झालेले नाही, ओढ्यांवर पूल बांधले गेले नाहीत. जनतेच्या प्रश्नांवर पंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या घोषणा होत असल्या तरी शेतकऱ्यांना आजही पाण्यातून वाट काढत शेती करावी लागत आहे.”
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार – फडणवीस भेटीची होणार फलश्रुती !
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी सरपंच गजानन वायाळ यांच्याकडे तातडीने रस्त्याचे खडीकरण करून नाल्यावर पूल बांधण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.








