Natural disaster causes loss of Rs 98 crore in Buldana : बुलडाण्यात नैसर्गिक आपत्तीने ९८ कोटींचे नुकसान, सरकारकडून फक्त पंचनाम्यांची घोषणा
Buldhana एप्रिल ते जुलै २०२५ या चार महिन्यांत नैसर्गिक आपत्तीने बुलडाणा जिल्ह्यात १.२३ लाख हेक्टरवरील शेतीचे नुकसान करत शेतकऱ्यांना आर्थिक व भावनिक खाईत लोटले आहे. या कालावधीत ९७.८१ कोटी रुपयांचा अंदाजित आर्थिक फटका बसला असून, सहा शेतकऱ्यांचा जीव गेला. पण मदतीच्या नावाने सरकार अजूनही केवळ पंचनाम्यांची पुडीच हाती देत आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार मोठा तडाखा
महिना नुकसान क्षेत्र (हेक्टर) आर्थिक फटका (₹)
एप्रिल २,४३६.३९ ४.१७ कोटी
मे ६,५९८.८० ११.३८ कोटी
जून ८७,३९० ८२.२५ कोटी
जुलै २६,६०५ पंचनामे सुरू
एकूण १,२३,०३०+ ९७.८१ कोटी रुपये
या आपत्तींमुळे १,१३,६९२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. यामध्ये सर्वसाधारण पीक ९५,९१८ हेक्टर, फलोत्पादक पीक ५०४ हेक्टर, तर अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत.
Samruddhi Mahamarg : निचऱ्याअभावी ‘समृद्धी’ लगतच्या शेतात पाणीच पाणी
२०१९ नंतर बुलडाणा जिल्ह्यात हवामानाचा मोठा असंतुलन सुरू झाले आहे. अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. विशेषतः अंजनी, कल्याणा, सुलतानपूर आणि हिरडव परिसरात चार ते पाच वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ६३ महसूल मंडळांत नुकसान नोंदले गेले आहे.
एप्रिल-मे महिन्यातील नुकसानीसाठी १४,९०९ शेतकऱ्यांना १५.५५ कोटींचे वाटप सुरू असले तरी जून-जुलै महिन्यातील पंचनामे पूर्णच झालेले नाहीत. सर्वाधिक नुकसान झालेल्या काळात रोख मदतीऐवजी फक्त आश्वासनांची सरबत्ती होत असल्याची शेतकऱ्यांची टीका आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. त्यांनी पंचनामे लवकर पूर्ण करा अशी तात्पुरती सूचना दिली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदतीबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.
Chandrashekhar Bawankule : मी बच्चू कडू यांचं नाव घेतलं नाही !
शेतकरी संघटनांचा सवाल आहे, “सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या भाषणात शेतकऱ्यांचे हित आहे, पण जमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात काहीच नाही. सरकारने हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर धोरणात्मक मदतीचे पॅकेज द्यावे, अन्यथा आंदोलन अटळ आहे.”