Breaking

Vidarbha Farmers : शेतकरी तयारीत, पण खतांचे भाव गगनाला!

 

Price hike of fertilizers and seeds : बियाण्यांचे भावही वाढले; मागणी वाढली, दरही चढणार?

Bhandara दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि महागाईच्या झळा सोसत तरीही शेतकरी नव्या आशेने खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात भंडारा जिल्ह्यात तब्बल २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने आखले आहे. यात सर्वाधिक १.८० लाख हेक्टर क्षेत्रावर धानाची लागवड होणार आहे. कडधान्य, तेलबिया, कापूस, ऊस यांसारख्या पिकांचाही समावेश आहे.

सध्या जिल्ह्यात ४४ अंश उष्णतेतही शेतकरी मशागत व बांधबंदिस्तीच्या कामात व्यस्त आहेत. मृग नक्षत्राच्या पूर्वी सर्व आवश्यक पूर्वतयारी पूर्ण व्हावी यासाठी कृषी विभाग आणि शेतकरी दोघेही सज्ज झाले आहेत.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सवलतीच्या दरात बियाणे मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. कृषी विभागाकडून बी-बियाण्यांचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरवाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक शेतकरी आधीच बियाण्यांच्या जुळवाजुळव करताना दिसत आहेत.

Shivsena Uddhav Balasaheb Thackrey : आमची चूल तुम्हीच सांभाळा, महिलांचे अनोखे आंदोलन

खते हे खरीप हंगामात अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. यासाठी कृषी विभागाने खताच्या साठवणुकीचे नियोजन हाती घेतले असले तरी महागाईचा फटका खत दरांवरही बसू शकतो, असे संकेत मिळत आहेत. शेतकऱ्यांच्या मते, यंदा खताचे दर चढे राहिल्यास शेतीचा खर्चही वाढणार आहे.

खरीप हंगामातील एक महत्त्वाचे संकट म्हणजे शेतमजुरांची कमतरता. अनेक शेतकरी मजूर मिळत नसल्याने स्वतः शेतात उतरले आहेत. यामुळे श्रमशक्तीवर भर दिला जात असून, काही ठिकाणी यंत्रसामग्रीच्या वापराचा पर्याय स्वीकारण्यात येत आहे.

Amravati Airport : नामकरणाच्या मुद्यावरून पुन्हा वाद, सरकार कैचीत!

यंदा खरीप हंगामासाठी धान हे प्रमुख पीक राहणार आहे. धानाशिवाय भुईमूग, मूग, तीळ, ऊस, कापूस यांसारख्या पिकांचीही पेरणी केली जाणार आहे. खत, बियाणे, यंत्रसामग्री आदींचे सुगम नियोजन करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न कृषी विभाग करत असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक संगीता माने यांनी सांगितले.