Vidarbha Farmers : तहसील कार्यालयासमोर ‘डफडे बजाओ आंदोलन’!

Protest Over Non-Receipt of Compensation for Excess Rainfall Victims : अतिवृष्टीग्रस्तांना नुकसानभरपाई न मिळाल्याने ठाकरे गट आक्रमक

Malkapur तालुक्यातील विवरा गावात २६ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांच्या घरांचे प्रचंड नुकसान झाले होते. या आपत्तीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री ना. संजय सावकारे, आमदार संकेती, तसेच उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे आणि तहसीलदार राहुल तायडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तातडीने १०० टक्के नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते.
मात्र, महिना उलटूनही अद्याप विवरा येथील शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना एक रुपयाचाही अनुदानाचा लाभ मिळाला नाही, याबद्दल संताप व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे तहसील कार्यालयासमोर ‘डफडे बजाओ आंदोलन’ करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध करत “विवरातील शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे” अशी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर नायब तहसीलदार चौधरी यांना निवेदन सादर करून आठ दिवसांत सर्व पीडित शेतकऱ्यांना व रहिवाशांना अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

Water crisis : मलकापुरात १५ दिवसाआड पाणीपुरठा, नागरिक संतापले

आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, शहर प्रमुख हरीदास गणबास, उपशहर प्रमुख शकील जमादार, वाहतूक सेना शहर प्रमुख इमरान लकी, अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सय्यद वसीम, तसेच विश्वनाथ पुरकर, दीपक कोथळकर, चांद चव्हाण, गजानन मेहेंगे, राजु नेवे, पद्माकर लांडे, बंडू पाटील, श्रीकृष्ण चोपडे, रघुनाथ सोनवणे, हरी तळे, कमल शिंदे, बाळू चोपडे, योगेश बिल, लहू सोनवणे, दिलीप वराडे, कैलास घुले, दामोदर पाटील, रमेश चौधरी, रहीमभाई बागवान आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.