Raid on illegal moneylender’s house, 58 documents seized : सहकार विभागाच्या पथकाने किराणा दुकानाची घेतली झाडाझडती
Yavatmal जिल्हा निबंधक (सावकारी) यवतमाळ यांच्या आदेशान्वये सावकारी झडती पथकाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अन्वये पुसद शहरातील अवैध सावकाराच्या दुकानावर व घरी एकाच वेळी धाड टाकली. यात पथकाला संशयास्पद असे ५८ दस्तावेज हाती लागले आहे.
अनिल मधुकर गडम, रा. मामा चौक, पुसद असे सावकाराचे नाव आहे. त्यांचे घर व सुभाष चौक पुसद येथील किराणा दुकानाची सहकार विभागाच्या पथकाने झाडाझडती घेतली. कलम १६ नुसार सावकारी अधिनियमा अंतर्गत धाड टाकली. झडतीदरम्यान घर व दुकानातून अवैध सावकारीच्या व्यवहार संबंधाने कागदपत्रे, दस्तावेवज, धनादेश, डायरी जप्त करण्यात आली आहे.
Vidarbha Farmers : अवकाळी पावसाच्या नुकसानाचे पंचनामे तातडीने करा
पुसद तालुक्यातील लोणी येथील तक्रारदार वैभव गोधाजी बोरकुट यांनी १७ मार्च रोजी सावकाराविरोधात जिल्हा निबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामध्ये गैरअर्जदार हे बेकायदेशीर सावकारी करीत असून अवैध सावकारीच्या व्यवहारात शेतजमिनीचे खरेदीखत लिहून घेतले आहे.
ते रद्द करून मिळावे व गैरअर्जदाराविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली होती. झडतीमध्ये कोरे बाँड, कोरे चेक, खरेदीखत, नोंदी असलेल्या डायऱ्या, चिठ्या असे एकूण ५८ कागदपत्रे पथकाच्या हाती लागले. ही कारवाई जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नानासाहेब चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये सहायक निबंधक केशव मस्के, सुनील भालेराव, सहकार अधिकारी अनिल सुरपाम, संजय पिंपरखेडे, सहकार अधिकारी श्रेणी-१ जी. पी. राठोड, सविता चांदेकर, चेतन राठोड, अमोल काळमोरे, राजेश नाईक यांनी ही कारवाई केली.