Vidarbha Farmers : रस्त्याचे काम दोन वर्षांपासून ठप्प, शेतकऱ्यांचे उपोषण

Road work stalled for two years; farmers stage a hunger strike : अमडापूर-डासाळा येथे प्रशासनाविरोधात संताप

Adampur अमडापूर ते डासाळा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे. शेतकऱ्यांनी सातत्याने निवेदने देऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून साखळी उपोषणाला सुरुवात केली.

शेतकऱ्यांनी या रस्त्याच्या कामासाठी ४ फेब्रुवारी रोजी चिखली तहसीलदारांना निवेदन दिले होते. त्यानंतर १९ मे रोजी पुन्हा निवेदन सादर झाले. मात्र, दोन्ही निवेदनांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने शेतकरी नाराज झाले. ११ जून रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनाही निवेदन देण्यात आले होते.

Vishwa Hindu Parishad : धर्मांतराच्या प्रयत्नाने तणाव, पोलिसांची चौकशी सुरू

त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी चिखलीचे नायब तहसीलदार यांनी ३३ फूट रुंदीचा रस्ता आखून दिला आणि पीडब्ल्यूडीनं कामालाही सुरुवात केली. परंतु, काही विघ्नसंतोषींच्या अडथळ्यांमुळे काम वारंवार थांबवण्यात आले. ठेकेदार व अधिकारी याकडेही दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

ST announcement : एसटी महामंडळाची घोषणा, ७५ बसस्थानकांवर मोफत वाचनालय

संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारत रस्त्यावरच उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर तीन दिवसांनंतर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल.