Stop forced debt collection immediately : शरद पवार गटाचा इशारा; तहसीलदारांना दिले निवेदन
Buldhana मार्च एंडच्या March End नावाखाली सरकारी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची कर्ज वसुली सुरू आहे. शेतकरी व कर्जदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ‘विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर आल्यानंतर कर्जमाफीचा विषय पद्धतशीररित्या टाळला जात आहे.’ शेतकऱ्यांना आधीच पडलेल्या शेतमालाच्या किमती, वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कुटुंबातील लग्न समारंभ आणि इतर खर्चामुळे कर्जाचा बोजा वाढला आहे.
Birth Certificate fraud : नायब तहसीलदारांनी दिलेले ५६११ जन्मदाखले रद्द
अशा परिस्थितीत सक्तीच्या वसुलीमुळे आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या बँका आणि पतसंस्थांकडून थकीत कर्ज वसूल करण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. “शेतजमिनींचे लिलाव, लिलावपूर्वी नोटीस बजावणे, इतर बँक खाती गोठवणे, मालमत्ता जप्त करणे यासारखे प्रकार सुरू झाले आहेत,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी. कर्ज भरण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी. शेतकऱ्यांना आणि कर्जदारांना कर्ज स्वेच्छेने भरण्याची संधी द्यावी, अशा मागण्या राष्ट्रवादी काँग्रेसने केल्या आहेत.
District Bank case : जिल्हा बँकेच्या सत्तासंघर्षात बच्चू कडूंची कुरघोडी!
‘मागण्या मान्य केल्या नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तालुक्यात मोठे जनआंदोलन उभारले जाईल,’ असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, युवक शहराध्यक्ष अभिनव खांडेभराड, कवीश जिंतूरकर, रंगनाथ कोल्हे, राजू शिरसाट, मन्नान खान पठाण, दीपक मस्के, गणेश बुरकूल, गणेश सवडे, रामेश्वर पवार, शेतकरी नेते गजानन जायभाये यांसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.








