Youth Congress warns of agitation for farmers’ demands : मागण्या पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा इशारा
Amravati शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस आक्रमक झाली आहे. विविध मागण्यांच्या संदर्भात राज्य शासनाने त्वरीत निर्णय न घेतल्यास १ मे महाराष्ट्र दिनी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला आहे.
तिवसा येथे तहसील कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी खासदार बळवंत वानखडे Balwant Wankhede आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर Yashomati Thakur यांच्या उपस्थितीत युवक काँग्रेसने तहसीलदार डॉ. मयूर कळसे यांना निवेदन दिले.
या निवेदनात विविध मागण्यांचा समावेश आहे. नियमित कर्ज परत करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा यांना भावांतर योजनेतून अनुदान मिळावे. पीक विमा रक्कम त्वरित अदा करावी. कृषिपंपाचा वीजपुरवठा दिवसा करण्यात यावा. तसेच संत्रा उत्पादकांना नुकसानभरपाई मिळावी आणि पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्ते व कालव्यांच्या पाटचऱ्यांची दुरुस्ती व्हावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष वैभव वानखडे, माजी सभापती दिलीप काळबांडे, नगराध्यक्ष प्रतिभा गौरखेडे, प्रिया विघ्ने आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अचलपूरमध्येही गुरुवारी तहसील कार्यालयासमोर काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात आली. शेतकरीहिताच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यात अतिवृष्टीग्रस्त संत्रा व सोयाबीन पिकांची भरपाई, भावांतर योजनेतून अनुदान, पीक विमा रक्कम, वीजपुरवठा दिवसा मिळावा अशा मागण्या होत्या.
Water crisis in Buldhana : बुलढाण्यातील भीषण वास्तव; १९ गावे तहानलेली, ७ गावे टँकरवर!
तसेच, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष नामदेव तनपुरे, अनुसूचित जाती विभागाचे राहुल गाठे, महिला आघाडीच्या अश्विनी पेटकर, ओबीसी अध्यक्ष दिनेश वानखडे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.