Vijaya Agrawal on Sajid Khan Pathan : वक्फ सुधारणा विधेयकावर दिशाभूल नको

Don’t be misled on the Waqf Amendment Bill : भाजपच्या माजी महापौरांचे काँग्रेस आमदाराला आवाहन

Akola संसदेत वक्फ सुधारणा विधेयक पारित झाले. मात्र अभ्यास न करता, समजून न घेताच चुकीचा अर्थ काढला जात आहे. या निर्णयानंतर विरोधकांकडून दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रचार केला जात आहे. यासंदर्भात अकोला महानगर भाजप आणि माजी महापौर विजया अग्रवाल यांनी थेट काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना आवाहन केले आहे. समाजात अपप्रचार करणे थांबवावे, असेही अग्रवाल यांनी म्हटले आहे.

मोदी सरकारच्या या निर्णयाचा कोणत्याही धर्माच्या व्यक्तींवर अन्याय करण्याचा हेतू नाही. या विधेयकाचा उद्देश पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेला बळकटी देण्यासह वक्फ संपत्तीच्या योग्य व्यवस्थापनासाठी आवश्यक सुधारणा करणे हा आहे. त्यामुळे याबाबत चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा वस्तुस्थिती समाजापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे, असे विजया अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

Mahayuti Government : तीन गॅस सिलिंडर मोफत योजनाही गुंडाळली!

हे विधेयक वक्फ संपत्तीच्या गैरव्यवहारास आळा घालण्यासाठी आणि व्यवस्थापन सुधारण्यासाठी आणण्यात आले आहे. यामुळे वक्फ बोर्डाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता वाढेल आणि कायदेशीर अडचणींना तोंड देण्यास मदत होईल.

विरोधकांनी या विधेयकाचा चुकीचा अर्थ लावून समाजात संभ्रम निर्माण करू नये, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कायद्यामुळे कोणत्याही धर्माच्या नागरिकांना नुकसान होणार नाही, तर व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.

Smart Visitor Management System : जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्यांची होणार स्मार्ट नोंद!

वस्तुस्थिती समजून घ्या
विधेयकाबाबत समाजात अवास्तव भीती पसरवणे टाळावे आणि योग्य माहिती घेऊनच मत व्यक्त करावे, असे आवाहन भाजप महानगर आणि माजी महापौर विजया अग्रवाल यांनी केले आहे.