Kokates resignation, demand for action against activists : कोकाटे यांचा राजीनामा, कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी
Pune : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. खास करून सूरज चव्हाण यांच्या मारहाणीप्रकरणी अजित पवारांना थेट जाब विचारण्यात आला. तुमच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला का मारलं? आमचं नेमकं काय चुकलं? असे थेट सवाल विजय घाडगे यांनी अजितदादांना विचारले.
यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे मान्य केले आणि संबंधित कार्यकर्त्याला पुन्हा पक्षात घेणार नाही, अशी हमी दिल्याची माहिती घाडगे यांनी दिली. मात्र या प्रकरणात कारवाई न झाल्यास, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही, तर आम्ही अजित पवार यांच्या दारात आंदोलन करू, असा इशाराही विजय घाडगे यांनी दिला आहे.सध्या या संपूर्ण प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवारांनी दोन दिवसांची वेळ मागितली असून, त्यामुळे माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Vijay Ghadge: हॉस्पिटल मधून थेट ॲम्बुलन्समध्ये बसत विजय घाडगे मुंबईकडे रवाना
दरम्यान, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा आजचा जळगाव जिल्हा दौरा अचानक रद्द करण्यात आला. ते चोपडा येथील अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते. मात्र कोणतेही कारण न देता कोकाटे यांनी दौरा रद्द केला आणि नंदुरबारकडे रवाना झाले. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली असून, आयोजक सुनील पाटील यांनी याबाबत माहिती दिली.