Vijay Ghadge: हॉस्पिटल मधून थेट ॲम्बुलन्समध्ये बसत विजय घाडगे मुंबईकडे रवाना

What did I do wrong? I’ll go and ask Ajitdada : माझं काय चुकलं? जाऊन अजितदादांनाच विचारणार !

Latur : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमधून थेट ॲम्बुलन्समध्ये बसून मुंबईकडे प्रयाण केलं आहे. माझ्यावर वारंवार अन्याय झाला असून, या साऱ्या प्रकारांचा जाब मी थेट अजित दादांना म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच विचारणार आहे, असं ते स्पष्टपणे म्हणाले.

रविवारी विजय घाडगे यांना सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकत निवेदन दिल्याच्या कारणावरून मारहाण करण्यात आली होती. या मारहाण प्रकरणी सुरज चव्हाणसह 11 जणांवर गुन्हा दाखल झाला. यापैकी 9 जणांना काही तासांतच जामीन मिळून सोडून देण्यात आले. ही प्रक्रिया इतक्या लवकर झाली की, पोलिस यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

Congress women MPS : दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज, काँग्रेसच्या महिला खासदारांनी दुबे यांना ठणकावले!

विजय घाडगे यांनी सुरज चव्हाणवर थेट आरोप करत सांगितलं की, तो पोलिसांचा जावई असल्यासारखा येतो आणि जामीन घेऊन जातो. माझ्यावर प्राणघातक हल्ला होतो, पण कारवाई नाममात्र. दुसरीकडे विधिमंडळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर पत्ते खेळतात, तरीही कोणतीच कारवाई होत नाही. मी मात्र निवेदन देतो म्हणून मला मारहाण होते.घाडगे यांनी स्पष्ट सांगितलं की, मी पत्ते फक्त टेबलवर टाकले. ना शिवीगाळ केली, ना वाईट वागलो. तरीही माझ्यावर प्राणघातक हल्ला झाला. सुनील तटकरे यांनी जर मला काही चूक वाटत असेल, तर त्यांनी माध्यमांसमोर सांगावं. त्या वेळी संपूर्ण जिल्ह्याचा मीडिया तिथे उपस्थित होता. ही सगळी माहिती मी अजित पवार दादांना समोरासमोर देणार आहे.

Admissions suspended : शिक्षण मंत्र्यांसह लोकप्रतिनिधींच्या 113 महाविद्यालयांचे प्रवेश थांबवले !

अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच घाडगे यांनी उपचार थांबवले आणि आपल्या समर्थकांसह मुंबईकडे प्रयाण केलं. त्यांच्यासोबत मराठवाड्यातील विविध भागांतील छावा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आहेत. एका ॲम्बुलन्स द्वारे त्यांनी प्रवास सुरू केला. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुनील तटकरे, आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर राजकीय दबाव वाढण्याची शक्यता आहे. घाडगे यांचा हा थेट संघर्ष राजकीय वर्तुळात नवीन वळण घेईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

_______