Congress accept the challenge of BJP leader Chandrashekhar Bawankule : होऊ द्या ‘दूध का दूध पानी का पानी’ सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या
Nagpur : विधानसभा निवडणुकीत ‘न भूतो..’ मिळालेल्या यशानंतर भाजप नेत्यांचा आत्मविश्वास चांगलाच बळवला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका आम्हीच जिंकू अशी भाषा भाजप नेत्यांकडून केली जात आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर ५१ टक्के मते घेऊन आम्हीच विजयी होऊ, असे म्हणत विरोधी पक्षांना जाहिर आव्हान दिले आहे. त्यांच्या या आव्हानाला काँग्रेसनेही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमचे नेते राहुल गांधी यांनी मतांची चोरी उघड केल्यानंतर त्याला भाजप नेते उत्तर देत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर आम्हाला आव्हान दिले आहे की, नागपूर महानगरपालिका निवडणुकीत ते ५१ टक्के मतदान घेतील. आम्ही त्यांचे आव्हान स्विकारतो आणि त्यांना प्रतिआव्हान देतो की, दूध का दूध अन् पानी का पानी होऊन जाऊ द्या अन् सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या.
School ID scam : शालार्थ आयटी घोटाळ्यातील फरार निलेश वाघमारेला अटक !
राज्य निवडणुक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅटवर घेता येणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. परंतु यापूर्वी मतांची चोरी झाल्याचे प्रचंड गंभीर स्वरुपाचे आरोप विविध राज्यांतील राजकीय पक्षांकडून वारंवार निवडणूक आयोगावर करण्यात आले आहेत. अशातच व्हीव्हीपॅटचा वापर करणार नाही, अशी भूमिका निवडणूक आयोगाने जाहिर केल्यामुळे इतर राजकीय पक्षांनी केलेल्या आरोपांची पुष्टी होते, असे वडेट्टीवार म्हणाले.
Maratha movement : आंदोलन जालन्यात कर, मुंबईत कर किंवा दिल्लीत कर…
एका प्रमाभात चार मतदान असल्यामुळे व्हीव्हीपॅटचा वापर झाल्यास जास्त वेळ लागेल, असे निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे. व्हीव्हीपॅटचा वापर होणार नसेल तर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्या आणि लोकांचा संभ्रम दूर करावा, असे आव्हान वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅटसह किंवा बॅलेट पेपरवर घेतल्या तरच जनतेचा निवडणूक आयोगावर विश्वास बसेल. अन्यथा जनतेचा विश्वास उडून जाईल, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.








