Vijay Wadettiwar : सरकारने केली मंत्र्यांच्या मलिदा खाण्याची सोय !

Congress Accuses Government of Arranging a ‘Feast for Ministers’ Instead of Serving the People : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कोट्यवधींच्या उलाढालीवर वाईट नजर

Nagpur : महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवरील विद्यमान व्यवस्थापन मंडळांऐवजी आता पणन मंत्र्यांच्या हातात सर्व सूत्रे जाणार आहेत. यातून मंत्र्यांना मलिदा खाण्याची सोय करण्यात येत आहे. बाजार समित्यांमध्ये कोट्यवधींची उलाढाल होते, त्यावर मंत्र्यांची वाईट नजर गेल्याने हा निर्णय झालेला आहे. निवडून आलेले प्रतिनिधी मंडळ बरखास्त करणे, हा अन्याय आहे, अशी टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

शेतकऱ्यांना भरघोस मदत करू, असे सरकारने सांगितले आणि ३१ हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. पण दिवाळीला सुरूवात होऊनली प्रत्यक्षात सरकारने १८०० कोटींच्या मदतीचे जीआर काढले. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये सरकारने कुठलीही वाढ केली नाही. हेक्टरी केवळ १० हजार रुपयांची मदत दिली आहे. त्यामुळे ही मदत तुटपुंजी असून ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची दिवाळी काळी ठरणार आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

Sandip Joshi : मायेच्या घराचा आधार आमदार जोशींचा ‘सोबत पालकत्व प्रकल्प’

राज्यातील २५३ तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. याबाबत सरकारने दिवाळीपूर्वी मदत करू, असे सांगितले पण जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे शेतीपिकांचे नुकसान, शेतजमीर खरडून जाणे, विहीरींचे नुकसान, घरांची पडझड झाली आहे. २५३ तालुक्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पण या तालुक्यांमधील शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत एनडीआरएफच्या निकषांप्रमाणेच आहे. त्यात जास्तीची मदत नाही.

Chandrashekhar Bawankule : परिवहन मंत्र्यांसमोरच बावनकुळेंनी अधिकाऱ्यांना झापले !

ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी खरवडल्या आहेत, त्यांना जाहीर केलेली मदत तीन वर्षांत मिळणार आहे. तोपर्यंत शेतकरी कसा जगणार, याचा विचार सरकारने केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निधेध करावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे. कापूस खरेदीला अजूनही सीसीआयकडून परवानगी मिळालेली नाही. त्यासाठी टाकलेल्या अटी जाचक आहेत. त्यामुळे कापूस खरेदी करताना हात आखडता घेतला जाणार आहे. यामुळे शेतकरी बरबाद होणार आहे, अशी भीती विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.