Vijay Wadettiwar : त्याच्या मानगुटीवर हिंदुत्वाचं भूत बसलंय !

Congress Leader Launches Scathing Attack on Sangram Jagtap : मोठी खाती देतील, असा त्याचा गैरसमज झाला आहे

Nagpur : दिवाळीची खरेदी हिंदुंच्या दुकानांतूनच करावी. कारण हिंदुंवर होणारे हल्ले हे मशिदींमधूनच होत आहेत, असे वादग्रस्त विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार संग्राम जगताप यांनी केले. त्यामुळे नवीन राजकीय वादळ निर्माण झाले आहे. ‘त्याच्या मानगुटीवर हिंदुत्वाचं भूत बसलं आहे. अशी विधाने केल्याने आपल्याला मोठी खाती मिळतील, असा त्याचा गोड गैरसमज झाला आहे’, अशा शब्दांत काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी संग्राम जगताप यांचा समाचार घेतला आहे.

त्याचे पक्षप्रमुख अजित पवार त्याला नोटीस पाठवतो, असं म्हणत आहे. पण तरीही याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. कुणाशी वैरत्व किंवा ममत्व भाव असणार नाही, अशी संविधानाची शपथ जगतापने घेतली आहे आणि तो असे भडकाऊ वक्तव्य करत आहे. त्याच्या वक्तव्याच्या विरोधात न्यायालयात जाऊन आम्ही त्याचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार आहोत. उद्याच्या (१३ ऑक्टोबर) बैठकीत आम्ही यावर चर्चा करू. असे आग लावणारे आणि द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात आम्हाला न्यायालयात न्याय मागावा लागेल, असे वडेट्टीवार म्हणाले.

Chandrashekhar Bawankule : कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात, अन् ती आम्ही करणारच !

सहकार मंत्र्यांचाही घेतला समाचार..
‘कर्जमाफी मागण्याचा छंद लोकांना लागलाय’, असे शेतकऱ्यांना डिवचणारे वक्तव्य राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. त्याचाही समाचार विजय वडेट्टीवार यांनी घेतला. ते म्हणाले, त्यांच्या जे पोटात आहे, ते ओठांवर आले. यावरून या सरकारची नियत काय आहे, हे लक्षात आलं. यांची नियतच खराब आहे, तेव्हा माफी मागून कसे चालणार? शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम यांच्या मंत्र्यांनी आजवर केलं आहे. १५ दिवसांत ८१ शेतकरी आत्महत्या करतात, याची लाज मंत्र्यांना वाटत नाही.

Sports Complex in Nagpur : १०० कोटी खर्चून नागपुरात होणार अद्ययावत क्रीडा संकुल !

 

कबुतरखान्याच्या संदर्भात सर्व मिलीभगत आहे, एखाद दुसरा मेला तरी काही फरक पडत नाही, असे वक्तव्य जैन मुनींनी केले. त्यावर वडेट्टीवार म्हणाले, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनीच दिले पाहिजे. ते बोलले तर त्यावर आम्हाला पुढे बोलता येईल. फडणवीस आमच्यामुळे मुख्यमंत्री झाले, असे जर जैन मुनी खुलेआम बोलत असतील, तर याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीच केला पाहिजे. जैनांनी शस्त्र हाती घेण्याची भूमिका घेतली आहे. आता मुनी शस्त्र हाती घेऊ लागले तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हेही मुख्य्मंत्र्यांनी सांगितले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.