defamation suit of ₹100 crore has been filed against Congress leader Vijay Wadettiwar : भाजपचे निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांची पत्रकार परिषदेत माहिती
Washim काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा कँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप पक्ष आणि वैयक्तिक प्रतिमेला तडा देणारे खोटे आरोप केल्याप्रकरणी, भाजपचे निवडणूक प्रमुख राजू पाटील राजे यांनी वडेट्टीवार यांच्यासह अन्य चौघांविरुद्ध १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. वाशिम येथील पत्रकार परिषदेत खुद्द राजू पाटील राजे यांनी ही माहिती दिली.
राजू पाटील राजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर २०२५ रोजी विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सार्वजनिकरित्या गंभीर आरोप केले होते. राजू पाटील यांच्यावर बनावट नोटांच्या संदर्भात गुन्हा दाखल असून त्यांना अटक झाली होती, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले होते. हे सर्व आरोप पूर्णपणे निराधार आणि खोटे असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. हे आरोप समोर आल्यानंतर राजू पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना कायदेशीर नोटीस बजावून, जाहीर माफी मागण्याची मागणी केली होती. मात्र, दिलेल्या मुदतीत वडेट्टीवार यांनी माफी न मागितल्यामुळे अखेर पाटील यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.
Datta Meghe death : मैत्रीचा ओलावा! दत्ता मेघे यांच्या निधनानंतर सांत्वनासाठी शरद पवार आज नागपुरात
या प्रकरणात केवळ विजय वडेट्टीवारच नव्हे, तर त्यांच्यासोबत इतर चार जणांवरही मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. यात विजय वडेट्टीवार, हरीश सारडा, तेजराव इनामदार, पंकज इंगोले, आनंद खेर्डे यांचा समावेश आहे. राजकीय द्वेषापोटी माझी आणि पक्षाची बदनामी करण्यासाठी हे धादांत खोटे आरोप करण्यात आले. कायद्यावर माझा विश्वास असून, सत्य लवकरच समोर येईल, असे राजू पाटील यांचे म्हणणे आहे. यास विजय वडेट्टीवार हे काय उत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








