Breaking

Vijay Wadettiwar : एकनाथ शिंदे यांनी पायावर धोंडा मारून घेतला !

Eknath Shinde caused his own loss, said Vijay Wadettiwar : अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विजय वडेट्टीवार यांचा मिश्कील टोला

मागील सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली. ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. या योजनेमुळे महायुतीला भरभरून मत मिळाले. पण आता त्याच बहिणीला सरकार २१०० रुपये देत नाही, ही शोकांतिका आहे. खरे पाहता एकनाथ शिंदेंनी ज्या योजना आणल्या, त्यामुळेच महायुती सत्तेत आली. पण शिंदे मुख्यमंत्री बनू शकले नाही. त्यांनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला, असा मिश्कील टोला काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

शिंदेची तुमच्यामुळेच ते १३०वर पोहोचले. नाहीतर ७०वरच अडकले असते. मग पुन्हा त्यांना तुमच्याकडेच यावे लागले असते, असेही वडेट्टीवार शिंदे यांना उद्देशून म्हणाले. शिंदेंच्या योजनांचा या बजेटमध्ये समावेश नसल्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लाडकी बहिण , अन्नपूर्णा योजना, गुलाबी रिक्षा, तीर्थाटन योजना आनंदाचा शिधा ,कोरोना काळात आणलेली गरिबांना १० रुपयात जेवण असलेली शिवभोजन थाळी अशा योजना आणल्या होत्या.

Eknath Shinde : नकली लोक नकलीच कामे करणार !

लाडकी बहिण आणि इतर योजनांचाही साधा उल्लेख अर्थसंकल्पात नाही. या योजना बंद होणार का, याचे उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यावे. सरकार आले पण एकनाथ शिंदे यांच्याच योजना बंद करण्यात आल्या, महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळी अनेक घोषणा केल्या. त्याचे निर्णय पहिल्या कॅबिनेट मध्ये अपेक्षित होते. नाहीतर पहिल्या बजेटमध्ये योजना आणल्या पाहिजे होत्या. पण महायुतीचे घोषणापत्र आणि अर्थसंकल्पात तफावत आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही असं अर्थमंत्री अजित पवार म्हणाले. त्याचवेळी महाराष्ट्र आता कर्जाच्या खाईत घालवल्याशिवाय महायुती सरकार थांबणार नाही, असे चित्र आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Pravin Darekar : मुख्यमंत्र्यांनी शेतकरीकेंद्री दृष्टीकोन समोर आणला !

दादा, हीच का तुमची आर्थिक शिस्त ?
विधानसभेत आज अर्थसंकल्पावर चर्चा होती. या चर्चेत बोलताना वडेट्टीवार म्हणाले महाराष्ट्र राज्यावर ८ लाख ३९ हजार २७५ कोटी कर्जाचा डोंगर झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना राज्यावर ५ लाख ७६ हजार कोटी कर्ज होते. तीन वर्षांत ४५ टक्के कर्जात वाढ झाली. अजित दादा हीच तुमची आर्थिक शिस्त का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

निवडणुकीत महायुतीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. अजित पवार म्हणाले शेतकरी कर्जमाफी बाबत बोललो नाही, पण त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीरनामा वाचन करताना शेतकरी कर्जमाफी करू, असे म्हणाले होते. त्यामुळे ही सरकारची सामूहिक जबाबदारी आहे, आता या जबाबदारीपासून सरकारने हात झटकू नये,असं काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.