Vijay Wadettiwar : दोन भावांचं जाऊ द्या; योजना बंद पडताहेत, त्याचं बघा !

Government should concentrate on public welfare schemes : नाना पटोले जे बोलले, त्या गैर काहीच नाही

Nagpur : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येणार का, याच्या चर्चा राज्यभर सुरू आहेत. या दोघांच्या एकत्र येण्याने महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता, त्यांनी हा प्रश्न धुडकावून लावला. ते म्हणाले, या बातम्या सर्वत्र येत आहेत. पण त्या दोन भावांना जाऊ द्या. आदिवासी, ओबीसी विभागांच्या योजना बंद पडत आहेत. त्याचं काय ते बघा. ओबीसी वसतिगृहासाठी सरकारकडे पैसे नाहीत. अशा अनेक विषयांना आपण हात घातला पाहिजे.

नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले असता, त्यांना जे वाटले ते बोलले. आता याला काय वाढवायचे? त्यावर पुन्हा मी बोलणार, त्यावर कुणी तिसरा आणखी उत्तर देणार, हे थांबवले पाहिजे. आपल्याकडे इतर खुप प्रश्न आहेत. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जयशंकर यांचं एक वक्तव्य आलं. त्यात त्यांनी सांगितलं की, आम्ही हल्ला करणार, जागा खाली करा. खरं तर हा प्रश्न जयशंकर यांच्या बोलल्यानंतर उद्भवला. कुणी तरी शत्रू राष्ट्राला कळवतं का की, आम्ही ऑपरेशन करणार आहोत. हेच नाना पटोले बोलले, यात गैर काही नाही.

Bachchu Kadu Visit : भाजपचे पक्षांतर जोरात, मात्र ‘भावांतर’ केव्हा ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रेशखर बावनकुळे म्हणाले की, ‘काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ’ या वक्तव्याचा वडेट्टीवार यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यात जे इंग्रजांसोबत होते, तेच आज आम्ही पाकिस्तानसोबत असल्याचं म्हणत आहेत. बिर्याणी खायला कोण गेलं होतं? याचे उत्तर द्यावे. लोकशाहीत विरोधकांनी उत्तर मागणे, हा लोकशातील अधिकार आहे. आता सरकारने खुलासा करावा.