Have a little shame, Valmik Karad is Dhanu Bhau’s friend : वाल्मिक कराड हा धनु भाऊचा सोबती
Nagpur : योगेश कदम आरोपीला पाठीशी घालण्यासाठी बोलले का, हे आधी तपासावे लागेल. आरोपीला वाचवण्यासाठीच त्यांच वक्तव्य असल्याचे वाटत आहे. असं वक्तव्य करत असताना जबाबदार व्यक्तीने भान ठेवलं पाहिजे. महायुती सरकारमध्ये राज्यमंत्री जर असे बोलत असतील ही गंभीर बाब आहे, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात वडेट्टीवारांनी विविध विषयांवर पत्रकारांशी चर्चा केली. ते म्हणाले, सावकारे म्हणतात की, अशाच घटना घडत असतात. त्यामुळे लाज लज्जा विकली की कमरेला गुंडाळून ? ठेवली थोडी तरी लाज बाळगा रे..! संपूर्ण महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालावी लागत आहे. ते पोलिसांना सपोर्ट करण्यासाठी बोलत असतील तर गृहमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सहमती आहे का, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.
शक्ती कायद्यासंदर्भात विचारले असता, राष्ट्रपतीची स्वाक्षरी शक्ती कायद्यावर का झाली नाही? शक्ती कायदाची अंमलबजावणी होऊ नये, यावर सरकारची काय भूमिका आहे? शक्ती कायदा महाराष्ट्रात लागू करायचा नाही का, हे सरकारने स्पष्ट करावे. कॅबिनेट पुढे हा विषय येईल तेव्हा ते विधेयक मागे घेतले जाईल. सरकार नव्याने ते विधायक आणणार आहे का? राष्ट्रपतीची स्वाक्षरी का झाली नाही आणि सरकारने ते का करून घेतले नाही, असे सवाल वडेट्टीवार यांनी केले.
हा कायदा लागू करण्यासाठी काय अडचण आहे? हा कायदा लागू झाला तर आमच्याच लोकांवर अडचणी होईल असं सरकारला वाटत आहे का? महिलांवर अत्याचार वाढत गेले. इज्जत लुटली गेली तरी देणे घेणे नाही, अशी भूमिका सरकारची आहे का? शक्ती कायदा विधेयक मागे घेऊ नका. काय दुरुस्ती करायची आहे ती करावी. पण या अधिवेशनात विधेयक आणून राष्ट्रपतीच्या साहिसाठी पाठवावे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. गुन्हेगारीत बिहार, यूपी पुढे आहे असं म्हणत होतो. मात्र आता महाराष्ट्र महिलांच्या अत्याचार याबाबतीत पुढे आहे. हे महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना शोभनीय नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.
वाल्मिक कराड हा धनु भाऊचा सोबती आहे. VIp ट्रीटमेंट मंत्र्याला नाही द्यायची तर मग कोणाला द्यायची? धनंजय मुंडेंचा आदेश असल्याशिवाय वाल्मीकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.