Vijay Wadettiwar : टेबलावर दारूचा घोट अन् खालून पैशाची नोट !

Manikrao Kokate brought disrepute to the government : स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणे योग्य नाही

Nagpur : राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांच्या भेटीवर नागपुरात आज (२८ जुलै) काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारमध्ये येवढा भ्रष्टाचार बरबटला आहे की तो खालपर्यंत पाझरला आहे. अधिकारी आणि साधे बाबूसुद्धा पैसे घेतल्याशिवाय फाईल पुढे सरकवत नाहीत. महाराष्ट्रात कोणाचा कोणावर धाक राहिलेला नाही. केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार आहे, असे नाही, तर ग्रामीण भागातसुद्धा गरीब लोकांची लूट होत आहे. चिरीमीरी घेतल्याशिवाय सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे भागत नाही.

नागपुरात एका बारमध्ये दारूचे घोट घेत, टेबलाखालून घेतलेल्या पैशांचा आस्वाद घेत सरकारी अधिकारी फाईली काढतात. रविवारी सुटीच्या दिवशीही हे अधिकारी काम करतात. म्हणजे ते आपल्या कामाप्रति किती इमानदार आहेत, हे नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओने दाखवून दिले आहे. पैसा आणि नशा, याचा दुहेरी आनंद हे सरकार व त्यांचे लोक घेत आहेत आणि सामान्य माणसाची लूट सुरू आहे. ‘टेबलावर दारूचा घोट अन् खालून पैशाची नोट’, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

Shweta Mahale : सुधीर मुनगंटीवार यांच्या विकासप्रकल्पांनी मी थक्क झाले

शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने करणे, विधान भवनात रमी खेळणे आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल होणे, यांमुळे जनतेच्या मनात सरकारबद्दल घृणा निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या मनात सरकारबद्दल असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला तर अधिक चांगले होईल. आम्ही सरकारचे अभिनंदन करू, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Maharashtra politics : बबड्या, बबड्याचा बाबा आणि वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई करा

गोरंट्याल यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी कशामुळे पक्ष सोडला हे माहिती नाही. पण ते तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. मंत्री राहिलेले आहेत. पक्षाने त्यांना मोठमोठ्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. त्यांचे नाव पक्षामुळे आहे. संकटाच्या वेळी पक्षासोबत राहणे आवश्यक आहे. पण अशा वेळी पक्ष सोडून जाणे म्हणजे पक्षाला कमकुवत करणे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष सोडून जाणे चुकीचे आहे. भाजपचे पक्ष फोडाफाडीचे काम अजूनही सुरूच आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.