RSS follower writing wrong history of Shivaji Maharaj : शिवरायांचे नाव घेऊन थोडी तरी लाज ठेवा आणि कारवाई करा
Nagpur : आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचा इतिहास लिहीणारे जेम्स लेन यांना माहिती देणारे कोण होते, हे पुण्यात गेल्यावर कळेल. कुठल्या विचाराच्या माणसाने जेम्सला माहिती पुरवली हेसुद्धा माहिती होईल. चुकीचा इतिहास लिहिणारी प्रवृत्ती कोण होती? ती आरएसएस होती, असं म्हणणार नाही. पण ते आरएसएसचे फॉलोअर होते, हे मात्र नक्की, असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
नागपुरात आज (१९ फेब्रुवारी) वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, विकिपीडियावर जे काही लिहिले आहे, त्यावर बंदी आणण्यासाठी सरकारचे हात बांधले आहेत का? त्यावर सरकारने बंद आणावी. पोस्ट डिलीट करून त्याला फटके मारावे. हा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यांना दयामाया न दाखवता कठोर शिक्षा केली पाहिजे. शिवरायांचे नाव घेऊन थोडी तरी लाज ठेवा आणि कारवाई करा, असे म्हणत त्यांनी सरकारला सुनावले.
Wardha Police : तो म्हणाला, मी चमत्कार करतो… त्यांनी ११२ नंबर डायल केला!
छत्रपती शिवाजी महाराज हे पहिले स्वातंत्र्य सेनानी आहेत. रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलं. शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलं. भाजीच्या देठालाही हात लावण्याची कुणाची हिंमत नाही झाली पाहिजे, असे आपल्या सैन्याला बजावणारे महाराज होते. संकटाच्या वेळी राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी ताकदीनं उभा राहणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना शक्ती देणाऱ्या राजाना वंदन करतो, असे वडेट्टीवार म्हणाले.
Crime in Nagpur : पाळत ठेवली तेव्हा कळले तो दोन मुलांचा बाप आहे!
विकिपीडियावर शंभूराजेंच्या बाबतीत जी भाषा वापरली, त्याचा निषेध मी केला आहे. अशांना रस्त्यावर फिरू न देता मिळेल तिथे फटके मारले पाहिजे. सरकारने यावर कारवाई केली पाहिजे. सरकारने छत्रपतींचे केवळ नाव घेऊ नये, तर अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी, असे विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सुनावले.