Breaking

Vijay Wadettiwar : सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यूप्रकरणी सरकारची पोलखोल !

 

Vijay Wadettiwar said that the government should reveal the truth about the death of Somnath Suryavanshi : पोलिसांच्या मारहाणीतच झाला सोमनाथचा मृत्यू

Mumbai : परभणी प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नैसर्गिक नसून तो पोलिसांच्या मारहाणीत झाला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने या प्रकरणी कितीही लपविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची आता पोलखोल झाली आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ विजय वडेट्टीवर यांनी केली.

परभणी संविधानाच्या अवमान प्रकरणी आंदोलन केलेल्या अनेक आंदोलनकर्त्यांचे कॉम्बिंग ऑपरेशन करून पकडण्यात आले. आणि पोलिस कोठडीत बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू साठी जबाबदार असलेल्या पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

Vijay Wadettiwar : भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या !

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी दोषी पोलिसांना निलंबित करण्यात यावे ,पोलिसांवर कठोर कारवाई करावी. याप्रकरणी दिशाभूल करण्याचा प्रयत्न सरकारने केला आता मात्र सरकार उघडे पडले आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

परभणीची घटना अत्यंत गंभीर व माणूसकीला काळीमा फासणारी आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाल्याचे प्रकरण पोलिसांना व्यवस्थित हाताळता आले नाही. शहरात शांततेने आंदोलन सुरु असताना पोलिसांनी अमानुष लाठीहल्ला केला. त्यात अनेकांना जबर मारहाण झाली, अनेकांना जेलमध्ये टाकले. यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांनाही अटक करुन बेदम मारहाण करण्यात आली व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

Vijay Wadettiwar : अजित पवारांना निर्भया फंडचा विसर पडला !

सरकारने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशानात सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू दम्याच्या आजाराने झाल्याची चुकीची माहिती दिली होती. त्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल केल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.