Breaking

Vijay Wadettiwar : सत्ताधाऱ्यांना वाचविण्यासाठी गुंडाळला शक्ती कायदा!

Shakti Act rolled out to protect ruling party leaders : काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका

Nagpur सत्तारुढ पक्षातील अनेकजण महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने केलेला शक्ती कायदा गुंडाळण्यात येत आहे, असा आरोप विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला.

राज्य सरकारने संमत केलेला शक्ती कायदा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (Draupadi Murmu) यांनी स्वाक्षरी न करताच राज्य सरकारकडे परत पाठविला आहे. महिला अत्याचार करणार्यांवर जरब बसविण्यासाठी तसेच महिलांना अधिक सुरक्षा देण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार असताना शक्ती कायदा (Shakti Act) संमत करण्यात आला होता. या कायद्याला राज्य विधिमंडळाने संमती दिल्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीसाठी हा कायदा पाठविण्यात आला होता.

Election Petition : आमदार साजिद खान यांना उच्च न्यायालयाची नोटीस

परंतु दरम्यान केंद्र सरकारने नवे फौजदारी कायदे अंमलात आणल्याने शक्ती कायद्याची नव्याने समीक्षा करण्याची आवशक्यता ्असल्याचे मत राष्ट्रपती भवनाने व्यक्त केले आहे.या कायद्याला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी स्वाक्षरी न केल्याने हा कायदा राज्यात अंमलात येऊ शकला नाही. आंध्रप्रदेश सरकारने तयार केलेल्या कायद्याच्या धर्तीवर हा कायदा तयार केला होता.

या संदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महिलांच्या संरक्षणासाठी शक्ती कायदा संमत करण्यात आला आहे. राज्य सरकारने हा कायदा राष्ट्रपतींकडून संमत करून घेण्यासाठी कां प्रयत्न केले नाही. या कायद्याबद्दल राज्य सरकारची नेमकी कोणती भूमिका आहे, हे स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रपतींकडे हा कायदा अनेक वर्षे पडून होता.

Narhari Zirwal : राज्यात अन्न भेसळ तपासणीसाठी 28 Mobile Lab!

या काळात राज्य सरकारने पाठपुरावा केला नाही. आता नव्याने हा कायदा करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. या विधेयकात काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास या सुधारणांसह हा कायदा संमत करण्यची गरज आहे. या संदर्भात या अधिवेशनात नवे विधेयक राज्य सरकारने विधिमंडळात मांडावे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा कायदा अंत्यत महत्त्वाचा आहे. महिला अत्याचारांच्या गुन्ह्यात प्रामुख्याने सत्तारुढ पक्षातील नेत्याचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यांना वाचविण्यासाठी तर शक्ती कायदा गुंडाळला जात नाही ना, अशी शंका वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे.