Something is wrong in the Mahayuti Government : वडेट्टीवारांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नवी चर्चा
Nagpur राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली. विरोधीपक्षनेता नेमण्याची देखील स्थिती राहिली नाही. महायुती सरकार स्थापन झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्रिपदावर एकमत असले तरीही गृहखात्यासह विविध खात्यांबाबत तिन्ही पक्षांमध्ये एकमत नव्हते. तरीही सरकार स्थापन झाले. मात्र सध्याच्या एकूणच परिस्थितीत फडणवीस हेच सर्वेसर्वा असल्यासारखे वाटत आहे. आणि हीच संधी साधून विरोधकांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार में कुछ तो गडबड है, असा दावा केला आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा नवी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री भाजपवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. वडेट्टीवार यांनी हाच धागा पकडून दावा केला आहे. ‘लोकांच्या मनात संताप आहे. कुठेही मंत्र्यांचे जल्लोषात स्वागत झाले नाही. हे सरकार मुळात लोकांच्या मनातील सरकार नसल्याने जनता वाट पाहत आहे. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत आहे,’ असं ते म्हणाले.
CM Devendra Fadnavis : दिल्लीतील मराठी संमेलनाची जगात होईल चर्चा
एकनाथ शिंदे या सरकारमध्ये ऑनलाइन उपस्थिती ठेवून उत्तम काम करत असेल तर याचा अर्थ कुछ तो गडबड है असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपुरात ते बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. सत्तेच्या भरवशावर तारीख पे तारीख सुरू आहे. निकाल का लागत नाही हा मोठा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.
निवडणुकांसाठी आम्ही तयार आहोत. मतदारदेखील याची वाट पाहत आहेत. ओबीसींच्या ५० हजार जागा आहेत. त्यांचा अधिकार मिळाल्याशिवाय निवडणूक होऊ नये अशी भूमिका माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. विषारी विचार पेरल्याशिवाय भाजपचे कमळ फुलू शकत नाही. त्यामुळे अशा विचारांची स्पेशल फोर्स तयार करून विचार पेरले जातात. दोन धर्मात तेढ, भांडण लावण्याचे काम करणारी फळी भाजपने तर केली आहे. नितेश राणे हे त्याचे प्रमुख आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सरकारचा प्रतिनिधी हा सीईओ असतो. १५ वर्षांपासून हे सुचले नाही का, आता काँग्रेसवर आरोप करण्यापेक्षा स्वत:कडे पाहा. अंबानीच्या अँटिलिया बंगल्याला एनओसीसाठी वक्फ बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षाला सत्ताधाऱ्यांनी फोन केले. याची चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.