Vadettiwar got angry; said, why is the minister not answering about the Bhavantar scheme : भावांतर योजनेबाबत मंत्री उत्तर का देत नाहीत?
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्याला भाव मिळत नाहीये. कापसाची आयात केल्यामुळे बाजारात भाव पडले, अशी टीका काँग्रेसचे विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केली. विधान सभेत प्रश्नोत्तर काळात कापसाच्या प्रश्नावरून विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले.
कापूस उत्पादक शेतकऱ्याचा कापूस आज ६२००-६३०० रुपयांनी खरेदी केला जात आहे. सीसीआयकडून खरेदी होत नाही. भावांतर योजनेबाबत मंत्री उत्तर देत नाहीत. राज्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी आत्महत्या करतो आणि मंत्री गांभीर्याने या प्रश्नाकडे बघत नाही. शेतकऱ्यांना हमीभाव देणार सांगत होते, आता हमीभाव खड्ड्यात गेला का, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
राज्यात २००० हून अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मंत्री गोल गोल उत्तर देत आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले. यावर मंत्री जयकुमार रावल यांनी बाजारात जितका कापूस येईल, तो कापूस सीसीआय खरेदी करेल. १५ मार्च पर्यंत जे शेतकरी नोंदणी करणार त्याची खरेदी करू, असे आश्वासन मंत्री रावल यांनी दिले.
तो जिवघेणा खड्डा बुजवा..
चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात असलेल्या घोडाझरी प्रकल्पावर पर्यटनासाठी गेलेल्या पाच मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चिमूर तालुक्यातील ही पाच मुले होती, काळजाला चटका लावणारी अशी ही घटना घडली. घरातील तरुण मुलांचा मृत्यू हे त्या कुटुंबासाठी दुःखद आहे. याच तलावात याआधी नागपूरच्या तरुणांचा देखील मृत्यू झालेला आहे.
Nitin Gadkari to Vidarbha Farmers : कोल्हापूरला शक्य आहे, मग विदर्भाला का नाही?
तीन पाणीपुरवठा योजना आल्याने कंत्राटदाराने या तलावात खड्डा खोदून ठेवला आहे. हा खड्डा बुजवावा, अशी विनंती लोकप्रतिनिधींनी केली. पण कंत्राटदाराने काहीच केले नाही. उलट त्याची अरेरावी सुरू आहे. त्यामुळे हा जिवघेणा खड्डा बुजवावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे केली. या तलावात १५ तरुणांचा मृत्यू झालेला आहे. ही घटना गंभीर आहे. शासनाने याची दखल घेऊन निवेदन द्यावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिले.