Breaking

Vijay Wadettiwar : शालेय पोषण आहारात सापडला मृत उंदीर!

Vijay Vadettiwar questions who will take action against : कारवाई कोणावर करणार, विजय वडेट्टीवार यांचा सवाल

Mumbai : रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. या प्रकरणी पुरवठादारावर कारवाई करणार का, असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडखळ येथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले, त्याचे नमुने प्रयोगशाळांत देऊन त्यांनी तपासणी केली नाही, हे गंभीर आहे. या प्रयोगशाळा या सरकारच्या आहे. जर ते नमुने तपासात नाही, तर काय कारवाई करणार? अशी पाकीट जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार, असाही सवाल वडेट्टीवार यांनी केला.

पोषण आहारात जर असे अन्न असेल तर तो बालकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार, असाही प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री यांनी केली. ही समिती झालेल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले. पण प्रयोगशाळांनी हे नमुने तपासले नाही. या प्रकरणीदेखील समिती चौकशी करणार. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळेल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या.