Vijay Wadettiwar : ब्रह्मपुरीतील ६ अल्पवयीन मुलींचे अपहरण; सरकार झोपले आहे का?

Vijay Wadettiwar criticizes the government in the case of abduction of six minor girls in Brahmapuri : वडेट्टीवारांचा हल्लाबोल, कायदा-सुव्यवस्थेचा बोजरावा उडाल्याचा आरोप

Nagpur राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, महाराष्ट्र अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी हादरला आहे. एकीकडे अशा गंभीर घटना राज्यात घडत असताना सरकार मात्र केवळ भोंदू बाबांच्या मागे लागल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. ब्रह्मपुरीतील ६ मुलींच्या अपहरणाच्या प्रकरणावरून त्यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

विधानसभेत स्थगन प्रस्ताव मांडताना वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील धक्कादायक वास्तव मांडले. गेल्या काही दिवसांत १० वी आणि १२ वी मध्ये शिकणाऱ्या ६ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले आहे. यापैकी केवळ २ मुलींचा तपास लागला असून ४ मुली अजूनही बेपत्ता आहेत. पोलीस यंत्रणा नेमकं करतेय काय?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

OBC census : ओबीसींची अचूक संख्या समोर येत नाही, तोपर्यंत हक्क मिळणार नाहीत

सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना वडेट्टीवार म्हणाले की, सरकार सीसीटीव्ही बसवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते, मग तालुका स्तरावर या व्यवस्था कुठे गायब आहेत? मुलींचे अपहरण होत आहे, त्यांचे मोबाईल बंद आहेत, तरीही प्रशासन सुस्त का? बेपत्ता मुलींचा शोध घेण्यासाठी सरकारने तातडीने विशेष पथकाची नियुक्ती करावी. तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये मुलींच्या सुरक्षिततेबाबत व्यापक प्रबोधन करण्याची गरजही विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.

Action against the Deputy Secretary : शासन निर्णयात लोकप्रतिनिधींची नावे; उपसचिवावर कारवाईची मागणी

यावेळी त्यांनी शेतकरी, अवकाळी पाऊस, शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीकडे सरकारचे लक्ष वेधले. स्थगन प्रस्तावातून वेडट्टीवारांनी भोंदू बाब खरात आणि त्याच्या नादी लागलेल्या नेत्यांचा उल्लेख करताना सकरवर चांगलेच ताशेरे ओढले. भोंदू खरात याच्या सोबत ज्या ज्या मंत्र्याचे फोटो आहे त्यांचे राजीनामे घ्या आणि संबंधित नेत्यांवर कारवाई करा अशी मागणी केली.