Vijay Wadettiwar said that the Mangeshkar family has no contribution beyond singing : गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काहीही योगदान नाही
Nagpur : मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारूंची टोळी आहे, असे विधान करून काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी काल (१० एप्रिल) खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या त्या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. आज त्यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी माझ्या मतावर ठाम आहे. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काहीही योगदान नाही.
नागपुरात आज (११ एप्रिल) वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाध साधला. ते म्हणाले, जे ऑटोग्राफचे पैसे घेतात, ते काय योगदान देणार? गाणे गायनापलिकडे त्यांनी काय केलं आहे? केवळ गाणं म्हणणं म्हणजे योगदान नाही. अशा लोकांकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते. मी आपल्या २५ वर्षांच्या कार्यकाळात मंगेशकर कुटुंबाचे कुठल्याही कार्यात काहीही योगदान बघितलेले नाही.
Vijay Wadettiwar : बीडमध्ये चोरट्यांचा कहर, चक्क गृहराज्यमंत्र्यांचा मोबाईल फोन चोरला !
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाबद्दल विचारले असता, राज्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकासोबत उन्हाळी धानाचेसुद्धा खूप नुकसान झाले आहे. उत्तर महाराष्ट्रात डाळिंबासोबत भाजीपाला पिकाचे नुकसान झालेले आहे. महाराष्ट्रात दुसऱ्यांदा अवकाळी पाऊस झालेला आहे. मात्र पहिल्यांदा जेव्हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रात पडला, तेव्हा कुठलाही पंचनामा सरकारने केला नाही आणि तसा आदेश काढला नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच जवळचे लोक टार्गेट करत आहेत !
हे सरकार शेतकऱ्यांसोबत दृष्टपणाने वागत आहे. दुश्मनासारखी वागणूक हे सरकार शेतकऱ्यांना देत आहे. राज्य सरकारने पंचनामे करून उशीरा पैसे दिल्यास शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. या सरकारला शेतकऱ्यांविषयी देणंघेणं नाही, असेच राज्यातील एकंदर परिस्थितीवरून दिसते, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.