Vijay Wadettiwar : भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या !

 

Vijay Wadettiwar’s demand to Chief Minister Devendra Fadnavis : विजय वडेट्टीवार यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी

Mumbai : नागपूरमध्ये हिंसाचार भडकला. या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी चित्रपटाला दोष दिला. पण राज्याच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री संविधानाची शपथ घेऊन द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते, केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान, अशी सतत भडकाऊ वक्तव्य केली. त्या मंत्र्याचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, अशी जोरदार मागणी काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

यासंदर्भात बोलताना वडेट्टीवार म्हणाले, छावा कांदबरी अनेक वर्षापूर्वी आली, चित्रपट येऊन पण महिने उलटून गेले. पण नागपूरचा कोरटकर त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, यांच्यावर कारवाई होत नाही. समाजात द्वेष तुम्ही पसरवणार आणि सरकार जबाबदारी कशी झटकू शकते. नागपूरमध्ये दगड आले, शस्त्र आली, पेट्रोल बॉम्ब आले, असे मुख्यमंत्री सांगतात. मग हे जमा होईपर्यंत पोलिस काय करत होते? हे पोलिसांचे इंटेलिजन्स फेल्युअर नाही का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar : नितेश राणे म्हणजे भाजप नेत्यांसाठी ‘खतरे की घंटी’

गोसीखुर्दला सुप्रमा द्या..
गोसीखुर्द प्रकल्पाला सुप्रमा मिळाव्या म्हणून प्रस्ताव दिला आहे. पण अजूनही कारवाई होत नाही. नवी मुंबई मधील कोंढाणे धरणाचे काम सिडकोला दिले आहे. या धरणाची किंमत ८०० कोटी वरून १४०० कोटी पर्यंत वाढवण्यात आली आहे. एका विशिष्ट माणसाला हे काम देण्यासाठी प्रकल्पाची किंमत वाढवली आहे. या कामाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रात जल जीवन मिशनचे काम रखडले आहे. कंत्राटदार काम अर्धवट सोडून निघून गेले आहेत. हे काम कोण पूर्ण करणार, असा प्रश्न जलसंपदा विभागाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा करताना विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला