Breaking

Vijay Wadettiwar : अनधिकृत होर्डिंगमुळे अपघात झाल्यास मंत्री जबाबदारी घेतील का?

Will the minister take responsibility if an accident occurs due to unauthorized hoarding : विजय वडेट्टीवर यांचा सरकारला सवाल, उदय सामंत म्हणाले ऑडीट करणार

Mumbai : मुंबईत अपघात झाल्यानंतर महायुती सरकार जागे झाले. पण फक्त मुंबईत होर्डिंग्जचा प्रश्न नाही. तर राज्यातही अनधिकृत होर्डिंग्ज वाढलेले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. नागभिड तालुक्यात मोठे होर्डिंग आहेत. ते कोसळले तर मोठा अपघात होईल. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील होर्डिंग्ज ऑडिट होणार का, आणि एखादी घटना घडल्यास मंत्री जबाबदार असतील का, असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी विधानसभेत उपस्थित केला.

राज्यात ९०२६ ठिकाणी होर्डिंगचे ऑडिट करण्यात आले आहे. राज्यात एकूण १ लाख ९३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आली आहे. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात विजय वडेट्टीवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिले. राज्यात एकूण ९०२६ ठिकाणी होर्डिंग्जचे ऑडिट करण्यात आले आहेत. १८८ ठिकाणी ऑडिट झाले नाही.

Santosh Deshmukh Murder Case : सरपंच हत्या प्रकरणावरून मराठा समाज आक्रमक

राज्यात १ लाख ९३८७ होर्डिंग्ज काढून टाकण्यात आले आहे, याप्रकरणी ज्यांनी सहकार्य केले नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण ५९ गुन्हे दाखल झाले आहेत. महापालिका क्षेत्रात ४८ गुन्हे तर नगरपालिका क्षेत्रात ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Sant Gadge Baba Amravati University : अकोल्यात हवे अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र!

एकूणच अनधिकृत होर्डिंग्जबाबत दरवर्षी राज्यात ऑडिट केले जाणार आहे, असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी दिले. यावर्षीचे होर्डींग्जचे ऑडिट अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर सुरू केले जाईल, अशी माहिती मंत्री सामंत यांनी सभागृहाला दिली.