Breaking

Vijay Wadettiwar : परिणय फुकेंकडे पुरावे असतील तर..

 

Congress leader challenged Parinay Fuke for evidence : काही लोक आमदार, खासदारांच्या नावावर असे उद्योग करतात

गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिलच्या भरडईच्या कामातील कथित गैरव्यवहार विधानसभेत मांडण्यासाठी फिक्सिंग झाले होते, असा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी विधान परिषदेत केला. त्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. यावर आज काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली.

वडेट्टीवार म्हणाले, काही लोक आमदार, खासदारांच्या नावावर असे उद्योग करत असतात. एका आमदार सांगितले की, माझ्या नावाने निवडणुकीत पैसे मागितले गेले. पण मला मिळालेच नाही. असे प्रकार फार होतात. परिणय फुके यांनी केलेल्या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी व्हावी. पण यातून फार काही तथ्य बाहेर येणार नाही.

Dr. Parinay Fuke : विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी Fixing?

कॉंग्रेस नेत्यांना बदनाम करण्याचं काम सुरू आहे. परीणय फुके यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते देतील.. या पुराव्यांच्या आधारावर चौकशी झाली पाहिजे. लोकप्रतिनिधी स्वतः बोलले का? की त्यांच्या नावावर आणखी कुणी बोललं, हेही तपासून पाहिले पाहिजे. यात काही तथ्य असेल तर चौकशी करावी. उगाच संशयाची सुई वळवून कुणाकडे बोट दाखवून बदनाम करू नये, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Parinay Fuke : बहिणी खुश होणार, बेरोजगारी दूर होणार!

वारंवार मागणी करूनही खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी न मिळाल्याने ऐन होळीच्या दिवशी बुलढाणा जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. आरमाळ येथील ‘युवा शेतकरी पुरस्कार’प्राप्त कैलास अर्जुनराव नागरे, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. यासंदर्भात वडेट्टीवार म्हणाले, मागील वर्षभरात 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्याचे कोणाला सोयर सुतक नाही. सरकारी वेबसाईटवर याचे अधिकृत आकडे आहेत. ज्या शेतकऱ्यांचा सन्मान तुम्ही करता, त्याला गौरवता, तो पाण्यासाठी चकरा मारून अखेर आत्महत्या करतो, याची खरं तर लाज वाटायला पाहिजे.

Bacchu Kadu : बच्चू कडू यांची अपात्रता १८ मार्चपर्यंत लांबणीवर!

सरकार जलयुक्त शिवाराच्या बाता करते. मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली आल्याचा दावा करते. मुख्यमंत्री, मंत्री मोठ्या मोठ्या बाता सांगतात. पुरस्कारप्राप्त तरुण शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ का आली? त्याला पाणी का दिलं नाही, याचे उत्तर आता कोण देणार, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला