Breaking

Vijay Wadettiwar : बव्हंशी मुस्लिम शिवाजी महाराजांसोबत होते !

 

Many Muslims were with Shivaji Maharaj : औरंगजेब ही प्रवृत्ती होती, त्याला धार्मिक दृष्टिकोनातून बघता कामा नये

Nagpur : औरंगजेब कोण होता, कसा होता, हे सगळ्यांना माहिती आहे. त्याने स्वतःच्या बापाला आणि भावाला सोडलं नाही, अशी प्रवृत्ती औरंगजेबाची होती. सत्तेसाठी कुठलीही दयामाया त्याने दाखवली नाही. अशा क्रुरकर्म्याला कुणीही समर्थन देणार नाही. मात्र कबरेच्या संदर्भातील निर्णय पुरातत्त्व विभागाकडे आहे. त्यावर सरकारने योग्य निर्णय घ्यावा एवढीच आमची भूमिका आहे. औरंगजेबाच्या नावाखाली धर्मांधता पसरवणे, हिंदू मुस्लिम वाद पसरवणे योग्य नाही. बव्हंशी मुस्लिम हे शिवाजी महाराजांसोबत होते, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.

नागपुरात आज (६ मार्च) विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, औरंगजेब ही प्रवृत्ती होती, त्याला धार्मिक दृष्टिकोनातून बघता कामा नये. औरंगजेब धर्मवेडा होता. त्याचा काळा इतिहासच आहे. अशा व्यक्तीची कबर महाराष्ट्रात आहे. या संदर्भात उदयनराजेंनी काही म्हटलं असेल तर सरकारने त्याबाबत निर्णय घ्यावा. यासंदर्भात आम्ही आमचे म्हणणे स्पष्टपणे मांडलेले आहे. आता सरकार काय कारवाई करते, ते बघावे लागेल.

Vijay Wadettiwar : बीडचं राजकारण म्हणजे मराठा विरूद्ध ओबीसी!

लाडकी बहीण योजनेसंदर्भात प्रश्न विचारला असता, 27 लाख लाडक्या बहिणींना सरकारने बाद केलं आहे. आणि वर आमच्या आदिती ताई तटकरे म्हणतात की, आम्ही जाहीरनाम्यात दिलं, ते लगेच काय लागू करण्यासाठी नाही. म्हणजे शेवटचे तीन महिने असताना लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार, असं वाटतंय. राज्याची आर्थिक स्थिती दोलायमान झाली आहे. आर्थिक स्थिती वाईट आहे. मागच्या बजेट मधील 40% खर्च झाला. अशा परिस्थितीत लाडक्या बहिणीच्या नावाखाली फसवणूक होत असेल तर लबाड भावांना लाडक्या बहीणी माफ करणार नाहीत.

Sudhir mungantiwar : फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याचा ठराव संमत होणार !

डांबर घोटाळ्याबाबत विचारले असता घोटाळेबाजांनी कितीही घोटाळे करावे. सरकारचा त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्याजवळ ज्यूडीशीयरी पासून ते मीडिया सगळेच आहेत. डांबर घोटाळा मोठा आहे. हा विषय आम्ही सभागृहात उचलू,, असे ते म्हणाले. सोयाबीन, कापूस आणि तूर खरेदी केली, असे सरकार सांगते. मात्र हमीभाव मिळत नाहीये. तुरीच्या संदर्भात अजूनही सरकारची परवानगी आलेली नाही. सरकार म्हणून याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्वरित लक्ष घालण्याची आवश्यकता असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettwar : अबू आझमींच्या निलंबनाच्या कारवाईला काँग्रेसचा पाठिंबा

पंकजा मुंडेंचा आजकाल वादग्रस्त बोलण्याचा सपाटा सुरू आहे. त्या सत्तेत असूनही त्यांना सत्तेत नसल्यासारखं वाटतं. सत्तेच्या विरोधात त्यांची भूमिका असल्याचे दिसत आहे. त्या डिस्टर्ब झाल्यासारख्या बोलतात. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्र्यांना उद्देशून त्या जे काही म्हणाल्या, त्यावरून टार्गेट मुख्यमंत्री आहेत का, असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.