Vijay Vadettiwar gave a warning to BJP leaders : सोयीनुसार विष पेरण्याचा काम करत आहे, आपलं राज्य तालिबानेकडे झुकत आहे
नितेश राणे हा संधीसाधू माणूस आहे. त्याला योगी व्हायचं आहे, की भोगी व्हायचं आहे, हे मला माहिती नाही. पण भाजपच्या प्रस्थापित नेत्यांसाठी मात्र ही ‘खतरे की घंटी’ आहे, असे म्हणत काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, काँग्रेसमध्ये असताना हेच पिता पुत्र हा हलाल केलेले मटण दाबून खाताना आपण पाहिलेलं आहे. रमजानच्या ईद मिलन मध्ये मटण तोडताना दिसत असणारे व्हिडीओसुद्धा आपण पाहिलेले आहेत.
राणे पिता-पुत्रांच्या कृतीचा अर्थ काय समजायचा? सोयीनुसार ते विष पेरण्याचे काम करत आहेत. याचा अर्थ त्यांना लोकशाही मान्य नाही. आपलं राज्य तालिबानेकडे झुकत चाललं आहे. त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन धर्मांत वाद निर्माण झाला आहे. रमजान सुरू आहे. होळी झाली आहे. यापूर्वी पवित्र सणांत अशा पद्धतीचं वातावरण होत नव्हतं. सगळं शांत असताना तेढ निर्माण करण्याचं काम होताना दिसत आहे. सरकारचा मंत्रीच जर हे करत असेल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारला निर्माण करायचा आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
Gulabrao Patil : पाणीपुरवठा योजनांमध्ये अनियमितता, निलंबन होणार
शेतकऱ्यांची आज जी परिस्थिती झाला आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्ला चढवला. ते म्हणाले, कर्जाखाली शेतकरी बुडालेला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही. सरकारचे धोरण शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये राज्यात वाढ झाली आहे. राज्य अगोदरच कर्जाच्या खाईत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणखी कर्ज काढा आणि त्यांचा जीव वाचवा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची वेळ आली आहे. ती कर्जमाफी झाली तरच आपण शेतकऱ्यांचा जीव वाचू शकतो.