BJP’s election preparations begin with the Shelapur melava : कार्यकर्त्यांचा अवमान करणाऱ्यांना धडा शिकवू, जिल्हाध्यक्षांचा दावा
Motala “भाजप कार्यकर्त्यांचा वापर करून सत्तेत येणारे; पण नंतर त्यांचाच अवमान करणारे ‘एहसानफरामोश’ लोक यावेळी टिकणार नाहीत. आगामी निवडणुकांमध्ये त्यांना जागा दाखवून देऊ,” असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी दिला. शेलापूर खुर्द (ता. मोताळा) येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
हा मेळावा भाजपच्या ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार चैनसुख संचेती, आ. श्वेता महाले, भाजयुमो जिल्हाध्यक्ष यश संचेती, जिल्हा उपाध्यक्ष गजानन घोंगडे, जिल्हा सचिव प्रवीण खर्चे, अनुसूचित जमातीचे जिल्हाध्यक्ष गजानन सोळंके, बाजार समिती संचालक सुनील देशमुख, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा अंजली नारखेडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
Kisan Congress : पीक विमा थकबाकीसाठी मलकापूरात गोधडी मुक्काम आंदोलन
आपल्या भाषणात शिंदे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. “आपला अपमान सहन करायचा नाही, कमळ फुलवायचे आहे. सत्ता कार्यकर्त्यांच्या जोरावरच मिळते,” असे सांगत त्यांनी उपस्थितांना खिळवून ठेवले. या मेळाव्यातूनच भाजपने जिल्हा परिषद व पालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून, येत्या काळात सर्कलनिहाय संवाद मेळावे घेतले जाणार असल्याचेही स्पष्ट झाले.
Bacchu Kadu : ‘मर किसान, मर जवान’ हा भाजपचा नारा, बच्चू कडूंची टीका
प्रदेश उपाध्यक्ष आ. चैनसुख संचेती यांनी सरकारच्या योजनांची माहिती कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत म्हटले की, “भाजपची खरी ताकद म्हणजे कार्यकर्ते. या योजना घराघरांत पोहोचवा, जनतेची सेवा करा आणि निर्भीडपणे निवडणुकांना सामोरे जा. स्थानिक स्वराज्य संस्थांवर कमळाचा झेंडा फडकवणे हीच खरी जबाबदारी आहे.” आमदार श्वेता महाले यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत बुलढाणा मतदारसंघातील प्रत्येक भाजप कार्यकर्त्याचे महत्त्व अधोरेखित केले.