Former Congress corporator alleges against MLA : खोटी तक्रार केल्याचा पत्रकार परिषदेतून आरोप
Nagpur नागपूर जिल्ह्यात काँग्रेसची पुरती वाताहत झाली आहे. याची प्रचिती लोकसभा निवडणुकीपासून वारंवार येत आहे. अंतर्गत राजकारणाने त्रस्त असलेल्या काँग्रेसला महापालिका निवडणुकीत चांगले यश मिळेल, अशी आशा आहे. पण आता काँग्रेसचेच माजी नगरसेवक कमलेश चौधरी Kamlesh Choudhari यांनी आमदार विकास ठाकरेंवर पत्रकार परिषदेतून आरोप केला आहे.
फुटाळा तलावाशेजारी असलेली ५.५ एकर जमीन चौधरी कुटुंबाची आहे. आमदार विकास ठाकरे व ज्वाला धोटे यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याविरुद्ध खोटा एफआयआर दाखल करून आपली राजकीय प्रतिष्ठा धुळीस मिसळविण्याचे काम केले आहे, असा आरोप कमलेश चौधरी यांनी केला.
Gopichand Padalkar : बाप मराठा, सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, अन् आई दुसरीच, पुण्यात एक ‘कॉकटेल’ घर
कमलेश चौधरी म्हणाले, ‘आजपर्यंत कृषी विद्यापीठाने या जमिनीवर हक्क सांगण्यासाठी तीन वेळा न्यायालयात आव्हान दिले. परंतु न्यायालयाने चौधरी परिवाराच्या बाजूने निकाल दिला. २०१८ मध्ये या जमिनीचे सीमांकन करण्यात आले. जमिनीची सर्व कागदपत्र चौधरी परिवाराच्या नावावर आहेत. परंतु आमदार विकास ठाकरे यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केला. त्यांनी ज्वाला धोटेंसोबत शासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपल्यावर आरोप लावून खोटा गुन्हा दाखल केला.’
चौधरी परिवार मागील ५० वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी निगडित आहे. आमदार ठाकरे आपली राजकीय प्रतिमा धुळीस मिसळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान काँग्रेसनेदेखील चौधरी यांच्यावर प्रत्यारोप केले. कमलेश चौधरी यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांच्याविरोधात बेछूट आणि निराधार आरोप केल्याचा दावा केला आहे.
Chief Justice : सरन्यायाधीशांपुढे विरोधकांचे ‘रडगाणे’, राजकीय नाट्याचा ‘प्रयोग’
स्वतः गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकलेले असूनही, त्यांनी स्वतःला निरपराध दर्शवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. कमलेश चौधरी यांचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही. ते गेली दहा वर्षे सातत्याने पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला खुलेआम पाठिंबा दिला आणि 2019 तसेच 2024 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध प्रचार केला, असंही पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.