Breaking

Vikas thakare: विकास ठाकरेंची मागणी, पश्चिम नागपूरच्या झोपडपट्ट्यांचे पट्टे वाटप तत्काळ करा

Immediately distribute the leases of the slums of West Nagpur : जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट; ७३ झोपडपट्ट्यांचा प्रश्न

Nagpur पश्चिम नागपूरच्या झोपडपट्ट्यांचे पट्टे वाटप तत्काळ करा अशी मागणी कॉंग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केले. त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांची भेट घेतली व याबाबत मागणी केली.

पश्चिम नागपूर मतदारसंघात ८४ झोपडपट्ट्या आहेत. यामधून फक्त ११ झोपडपट्ट्यांतील रहिवाशांकडेच पट्टे आहेत, तर उर्वरित ७३ झोपडपट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मात्र, येथील झोपडीधारकांना अद्याप मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाही. नासुप्रच्या मालकीच्या भूखंडांवरील झोपड्या आणि झुडपी जंगलातील भूभाग यांची अचूक सीमारेषा ठरवण्यासाठी नवीन सर्वेक्षणही सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण सध्या अंबाझरी आणि पांढराबोडी परिसरात सुरू आहे.

Nagpur collector: जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा, उद्योजकांसाठी थर्मल ॲश मोफत

झुडपी जंगलातील झोपडपट्ट्यांची स्वतंत्र यादी राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहे. पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आधारे धोरण ठरविल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल. मानकापूर येथील राजनगर सोसायटीमधील झोपडपट्टीवासीयांचे पुनर्वसन एसआरए किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत करण्याची मागणीदेखील आ. ठाकरे यांनी केली.

Aashadhi ekadashi: पाच महिलांसह ३८ सायकलपटूंची अमरावतीहून पंढरपूरपर्यंत सायकल वारी

त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आणि नासुप्रला अशा योजनांसाठी आवश्यक जागा शोधण्याचे निर्देश दिले. याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी पट्टेवाटपाची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे निर्देश महसूल, मनपा व नासुप्रला दिले. एकीकडे भाजपचे लोकप्रतिनिधी पट्टे वाटपासाठी आग्रही असताना दुसरीकडे आता ठाकरे यांनीदेखील यासाठी पुढाकार घेतला आहे. मनपा निवडणूकीत भाजपकडून याचे क्रेडिट घेण्यात येण्याची शक्यता असल्याचा अंदाज आल्यामुळेच ठाकरे यांनी पट्टेवाटपासाठी हा पुढाकार घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.