Vikas Thakre : कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा !

Congress Demants action against law and order offenders : सीसीटीव्ही फुटेजमध्ये १० ते १२ जणांचा गट असल्याचे स्पष्ट

Nagpur : काँग्रेसचे विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी यांच्या पूर्व नागपुरातील सेंट्रल एव्हेन्यू येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ असलेल्या कार्यालयावर ३१ ऑगस्ट रोजी हल्ला करण्यात आला. ही घटना साधी नसून नियोजित स्वरुपाचा हल्ला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत आणि हल्ल्यात १० ते १२ जणांचा गट सामील असल्याचे स्पष्ट दिसते आहे. तरीही पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले नाहीत. मुळातच लोकप्रतिनिधीच्या कार्यालयावर हल्ला होणे म्हणजे कायदा व सुव्यवस्थेला दिलेले आव्हान आहे. अशा लोकांवर गंभीर गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी आणि काँग्रेस नेत्यांनी केली आहे.

हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनीच केला, असा आरोप करत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल (१ सप्टेंबर) पूर्व नागपूरचे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या घरावर चालून जाण्याचा प्रयत्न करत आंदोलन केले. या आंदोलनात आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश महासचिव अतुल कोटेचा, उमाकांत अग्नीहोत्री, माजी मंत्री अनीस अहमद, माजी महापौर नरेश गावंडे, गिरीश पांडव, माजी नगरसेवक प्रशांत धवड, माजी नगरसेवक नितीन साठवणे, नयना झाडे, ज्ञानेश्वर ठाकरे, पृथ्वी मोटघरे, राजेश पौनीकर यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Two MLAs in bitter clash : पूर्व नागपुरात पेटला भाजप आणि काँग्रेस आमदारांत वाद !

आंदोलनानंतर आमदार ठाकरे आणि आमदार वंजारी यांच्या नेतृत्वात पदाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. काही महिन्यांपूर्वीही वंजारी यांच्या कार्यालयाच्या फलकावर समाजकंटकांनी आक्षेप घेत निदर्शने केली होती. त्यासंदर्भात २२ जणांची नावे पोलिसांना देण्यात आली होती. पण कोणताही कारवाई न केल्याने त्यांचे मनोबल वाढले, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. पुढील काळात आमदार आणि कार्यकर्त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याची मागणी काँग्रेस नेत्यांनी केली. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे यांचा भुजबळांवर थेट हल्लाबोल!

घडलेला प्रकार गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करून समाजकंटकांवर कठोर कारवाई करू. तपासात आणि कारवाईमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी काँग्रेस नेत्यांना दिले.