Vikhe Patil’s strong attack on Haake : विखे पाटलांचा हाकेंवर जोरदार हल्ला
Mumbai : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असतानाच राज्याच्या राजकारणात नव्या पुढाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटलांवर हल्लाबोल केला होता. यावर आता ज्येष्ठ नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट हाके यांना सुनावत खोचक टोले लगावले आहेत.
“ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हा सरकारचा शब्द आहे. अशा परिस्थितीत हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची गरज नाही. मुक्ताफळे उधळणे थांबवावीत. समाजाचं पुढारपण करायला कुणीही बंदी घातलेली नाही, पण दुसऱ्या समाजावर बोट ठेवण्याचा अधिकार कुणालाच नाही,” अशा शब्दांत विखेंनी हाकेंना लक्ष्य केलं.
Crime in Akola : कृषीनगरातील हिंसाचार प्रकरणात १७ जणांवर ‘मोक्का’ कारवाई
ते म्हणाले की, “राजकारणात जे नवे पुढारी तयार झाले आहेत त्यांचं समाजासाठी काहीही योगदान नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. ओबीसींना आरक्षण मिळालं तेव्हा मराठा समाजाने कधी विरोध केला नाही. आज मराठे स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत, तेव्हा ओबीसी आरक्षण धोक्यात न आणता त्यांना आरक्षण मिळू शकतं. मग याला विरोध करण्याचं कारण काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, विखे पाटलांनी अपघाताने पुढारी झालेले लोक स्वार्थासाठी राजकारण करत असल्याचंही म्हटलं. हाके यांच्यावर थेट हल्ला चढवतानाच त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनाही लक्ष्य केले. “स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणवून घेणारे थोरात आरक्षणाबाबत काहीच गांभीर्य दाखवू शकले नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण कोर्टात घालवलं, हे तुमचं पाप आहे. आज जे लोक राजकीय सदम्यातून सावरू शकलेले नाहीत, त्यांनी आत्मचिंतन करायला हवं,” असा टोला विखे पाटलांनी लगावला.
Local Body Election : प्रभारींकडून काँग्रेसची झाडाझडती, निवडणुकीसाठी केले बदल
मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेली ही राजकीय वाद आता राज्यातील राजकीय समीकरणांना नवा रंग देणार, हे स्पष्ट होत आहे.