File a case of treason against Abu Azmi : विश्व हिंदू परिषद-बजरंग दलाची मागणी; मुख्यमंत्र्यांना निवेदन
Gondia औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारे विधीन करून आमदार अबु आझमी यांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. राज्यभरात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे. औरंगजेबाला कुशल शासक म्हणून त्यांनी वाद ओढवून घेतला. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांना अधिवेशनापुरता का होईना सभागृहातून निलंबित करण्यात आले. पण, तरीही आझमींविरोधात गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांचे सदस्यत्व रद्द व्हावे, यासाठी राज्यभर आंदोलने सुरू आहेत. गोंदियात देखील त्याचे पडसाद उमटले.
औरंगजेबला कुशल शासक म्हणत त्यांची वाखाणणी करणाऱ्या अबू आझमींचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे. आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केली. यासाठी शुक्रवारी (दि. ७) जिल्हाधिकारी प्रजित नायर व पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
Abu Azmi controversy : ठाकरे गट, समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
समाजवादी पक्षाचे विधानसभा सदस्य अबू आझमी यांनी मुंबई विधानसभेत औरंगजेबाला कुशल शासक सांगत त्यांची वाखाणणी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. अशातच येथील बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेनेही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला. त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल
निवेदन देताना प्रांत संयोजक नवीन जैन, जिल्हा सहमंत्री सुनील कोहळे, विभाग संयोजक सुभाष पटले, जिल्हा संयोजक अंकित कुलकर्णी, सालेकसा प्रखंड अध्यक्ष बद्री दशरिया, तिरोडा प्रखंड मंत्री प्रदीप बिसेन, संघटन मंत्री श्रीकांत सावळे, दक्षिण-पश्चिम प्रखंड मंत्री भूमेश डहारे, सहमंत्री भोला कोकाटे, उत्तर प्रखंड संयोजक हार्दिक जिवानी, दक्षिण-पश्चिम प्रखंड साप्ताहिक मिलन प्रमुख बबलू गभणे आदी उपस्थित होते.