Breaking

VNSS mission : शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज, अवैध सावकारीला आळा!

Timely loans to farmers, stop illegal moneylenders : स्वावलंबन मिशनच्या बैठकीत महत्त्वाचे ठराव

Akola गरजू शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळावे आणि अवैध सावकारीवर कठोर कारवाई व्हावी, असे स्पष्ट निर्देश कै. वसंतराव नाईक स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे पाटील यांनी जिल्हास्तरीय बैठकीत दिले. लोकशाही सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमान्वये आतापर्यंत ५५ गुन्हे दाखल झाले असून, २१ प्रकरणांमध्ये नोंदणीकृत खरेदीखत अवैध ठरवण्यात आले आहे. याअंतर्गत १५१.१५ एकर शेती, ४,९३९.५० चौ. फुट जागा आणि एक राहती सदनिका मूळ मालकांना परत करण्यात आली आहे. अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Dr. Pankaj Bhoyar : उद्धव ठाकरेंवर जनतेचा विश्वास राहिला नाही

सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी खरीप हंगामासाठी १,३०० कोटी, तर रब्बी हंगामासाठी २०० कोटी असे एकूण १,५०० कोटींचे कर्जवाटप लक्ष्य ठेवण्यात आले आहे. याअंतर्गत, १५ फेब्रुवारीअखेर १,०६,७०८ सभासदांना १,१५१.८२ कोटींचे खरीप कर्ज आणि ७,४४० सभासदांना ९५.१७ कोटी रब्बी कर्ज वितरित झाले आहे.

ॲड. हेलोंडे पाटील यांनी चारा टंचाई रोखण्यासाठी गायरान जमिनीवर चारा लागवड करण्याचे निर्देश दिले. तसेच, पीक विमा योजनांची माहिती ग्रामपंचायत स्तरावर पोहोचवावी आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.

Sudhir Mungantiwar : “महाकुंभात भक्तीची अनुभूती : मुनगंटीवारांचे सपत्नीक पवित्र स्नान आणि आध्यात्मिक दर्शन”

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे:
शेतीच्या बांधावर जैविक प्रयोगशाळा स्थापन करणे
प्रधानमंत्री कृषी सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना
वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी भरपाई योजना
आदिवासी शेतकऱ्यांसाठी विशेष योजना

बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेतकऱ्यांना शाश्वत आर्थिक मदत मिळावी आणि शेतीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे.