Breaking

Vote theft case ‘ मत चोरी प्रकरणात, “दूध का दूध, पानी का पानी करा”

Sharad Pawars direct challenge to the Election Commission : शरद पवारांचा थेट निवडणूक आयोगाला आव्हान

Nagpur :दिल्लीत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना मत चोरीच्या वादाने अधिकच उधाण आले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काल सत्ताधाऱ्यांवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर थेट मत चोरीचा आरोप करत राजकारणात खळबळ उडवून दिली. त्यांच्या या आरोपानंतर भाजप नेत्यांकडून जोरदार प्रतिक्रीया आल्या, तर निवडणूक आयोगानेही त्यांना ‘नवीन बाटलीत जुनी दारू’ अशी उपमा देत माफी मागण्याची मागणी केली.

या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार नागपूर दौऱ्यावर असताना या वादात उघडपणे उतरले. राहुल गांधींच्या आरोपांना पवार यांनी समर्थन देत निवडणूक आयोगालाच थेट आव्हान दिले – “दूध का दूध, पानी का पानी करा”. पवार म्हणाले की, जर राहुल गांधींचे आरोप चुकीचे असतील तर आयोगाने स्पष्ट पुरावे देऊन ते फेटाळून लावावे. पण आरोपांवर फक्त भाजप नेत्यांनी नव्हे, तर आयोगानेच अधिकृत उत्तर द्यायला हवे.

Bhumares land dispute ; खासदार भुमरेंच्या ड्रायव्हरला ‘ गिफ्ट ‘ मिळालेल्या जमिनीची किंमत 241 कोटी !

शरद पवार यांनी आयोगावर झालेल्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, “राहुल गांधी यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर संशय घेण्यास वाव आहे. त्यामुळे आयोगाने या आरोपांची तपासणी करून देशासमोर सत्य आणावे. शपथपत्र मागण्याऐवजी आयोगाने तथ्य मांडायला हवे.”

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांचा शब्द झाला पूर्ण, रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यात !

पवारांच्या या भूमिकेमुळे विरोधकांनी मत चोरी प्रकरणात आणखी आक्रमक पवित्रा घेतल्याचे स्पष्ट होत आहे, तर या प्रकरणात निवडणूक आयोगाची पुढील पावले काय असतील, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.